नवी दिल्ली - मेट्रो मॅन नावाने प्रसिद्ध असलले ई. श्रीधरन भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. केरळात भाजपाकडून 21 फेब्रुवारीला विजय यात्रा काढण्यात येणार आहे. या विजय यात्रेदरम्यान ई. श्रीधरन औपचारिकरित्या भाजपामध्ये प्रवेश करतील. केरळ प्रदेशाध्यश्र के सुरेंद्रन यांनी ही माहिती दिली.
स्थापत्य अभियंता असणारे ई. श्रीधरन कोलकाता ते दिल्ली मेट्रोसाठी मोठं योगदान दिलं आहे. तसेच दिल्ली मेट्रो अंमलबजावणीतही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. श्रीधरन हे 1995 ते 2012 पर्यंत दिल्ली मेट्रोचे संचालक होते. मेट्रोमधून प्रवास करणं हे एक स्वप्न होतं. ते स्वप्न श्रीधरन यांनी सत्यात उतरवलं. त्यांच्या कामाच्या शैलीने सर्वांना प्रभावित केलं आहे. प्रत्येक काम वेळेच्या आत पूर्ण करणं हे त्यांच वैशिष्ट्ये आहे.
विविध पुरस्कारांनी सन्मानित -
विकासकामांमधील योगदानासाठी त्यांना फ्रान्सने 'नाईट ऑफ दी लिजन ऑफ ऑनर' पुरस्काराने सम्मानित केले होते. तर भारत सरकारनं त्यांच्या कामासाठी ई. श्रीधरन यांना 2001 मध्ये पद्म आणि 2008 मध्ये पद्म विभूषण पुरस्काराने सम्मानित केले होते. तर टाईम मासिकाने त्यांना 'आशिया हिरो' असे संबोधले होते. याचबरोबर जपानने देखील त्यांना 2013 मध्ये ऑर्डर ऑफ रायझिंग सन पुरस्काराने गौरवलं होतं. श्रीधरन यांच्या जीवनावर ’मेट्रोमॅन श्रीधरन’ नावाचे पुस्तक एम.एस. अशोकन यांनी लिहिले आहे, त्याचा मराठी अनुवाद अवधूत डोंगरे यांनी केला आहे