कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका सभेला संबोधीत करताना, त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली. जर येत्या सहा महिन्यात तृणमुल काँग्रेसचे कार्यकर्ते सुधारले नाहीत तर त्यांचे हात-पाय तोडू आणि त्यांना रुग्णालयात नाही, तर स्मशनात पाठवू, असे वक्तव्य दिलीप घोष यांनी केले आहे. जर आम्ही सत्तेत आलो, तर पुन्हा राज्यात लोकशाही प्रस्थापित करू, असे ते म्हणाले.
घोष यांची दिली धमकी
केंद्र सरकार तुमच्यासोबत असून राज्यात स्वतंत्र आणि निपक्ष विधानसभा निवडणूक पार पडतील, हे केंद्र सरकार सुनिश्चित करेल. विधानसभा निवडणूक राज्यातील पोलिसांच्या नाही, तर केंद्रीय सुरक्षा दलाच्या देखरेखीखाली होतील. तसेच येत्या काही दिवसात जर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या खोडी सुधारल्या नाहीत तर त्यांना आम्ही स्मशानभूमीत पाठवू, असे दिलीप घोष म्हणाले. तथापि, दिलीप घोष हे राज्यातील राजकीय वातावरण बिघडवत आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.