महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मेधा पाटकराचं शेतकऱ्यांसह ग्वाल्हेर महामार्गावर आंदोलन; दिल्लीकडे जाताना पोलिसांनी रोखले - ग्वाल्हेर महामार्गावर शेतकऱ्यांचे आंदोलन

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर शेतकऱ्यांसह दिल्लीकडे कूच करत आहेत. मात्र, त्यांना यूपी-राजस्थान सीमेजवळील ग्वाल्हेर महामार्गावर पोलिसांनी रोखलं आहे. आंदोलन थांबवण्यासाठी राजस्थान आणि यूपीचे अधिकारी मेधा पाटकर यांच्या संपर्कात आहेत. मात्र, आतापर्यंत त्यावर कोणताच तोडगा निघालेला नाही.

पाटकर
पाटकर

By

Published : Nov 27, 2020, 1:48 PM IST

आग्रा - केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थानमधील शेतकरी कृषी कायद्यांविरोधात दिल्लीकडे कूच करत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर शेतकऱ्यांसह दिल्लीकडे निघाल्या आहेत. मात्र, त्यांना यूपी-राजस्थान सीमेजवळील ग्वाल्हेर महामार्गावर पोलिसांनी रोखलं आहे. महामार्गावरच शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. त्यामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक सुरू करण्यासाठी आणि आंदोलन थांबवण्यासाठी राजस्थान आणि यूपीचे अधिकारी मेधा पाटकर यांच्या संपर्कात आहेत. मात्र, आतापर्यंत त्यावर कोणताच तोडगा निघालेला नाही.

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना ग्वाल्हेर महामार्गावर रोखलं

शेतकऱ्यांना दिल्लीकडे जाऊ देण्याची मागणी मेधा पाटकर यांनी योगी सरकारकडे केली आहे. मेधा पाटकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी प्रशासनाकडून दोनदा प्रयत्न करण्यात आला. महामार्ग ठप्प झाल्याने अधिकाऱ्यांनी मेधा पाटकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी 5 वाजता एकतर्फी महामार्ग सुरू केला.

ग्वाल्हेर महामार्गावर शेतकऱ्यांचे आंदोलन

महामार्गावर रोखल्यामुळे आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत आहेत. आम्हाला दिल्लीकडे जाऊ न दिल्यास आम्ही इथेच आंदोलन करू, अशी भूमिका पाटकर यांनी घेतली आहे. आम्ही राजस्थानच्या भूमीवर आहोत. मात्र, आमच्याशी चर्चा करण्यासाठी उत्तर प्रदेशचे अधिकारी येत आहेत. त्यांना आम्हाला रोखण्याचा काहीच अधिकार नाही. हे आंदोलन देशव्यापी असून योगी सरकार आम्हाला अडवू शकत नाही. आम्हाला योगी सरकारने पुढे जाऊ दिले नाही. तर आम्ही येथून हटणार नाही, असे पाटकर यांनी सांगितलं.

दिल्ली चलो आंदोलनाचा दुसरा दिवस -

दिल्ली चलो आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. सरकारने चर्चेसाठी ३ डिसेंबरची वाट न पाहता, तातडीने शेतकरी संघटनांशी चर्चा करावी, अशी मागणी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली आहे. आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना ठेवण्यासाठी दिल्लीतील नऊ क्रीडांगणे तात्पुरत्या तुरुंगात बदलण्याची मागणी दिल्ली पोलिसांनी केली होती. मात्र, दिल्ली सरकारने ही मागणी फेटाळली आहे. शेतकरी आंदोलनाचे वृत्तांकन करत असलेल्या ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी अर्शदीप कौर या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details