महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Market Fall: जागतिक इक्विटी बाजारातील कमकुवत ट्रेंडमुळे बाजार घसरला - बीएसई

जागतिक इक्विटी बाजारातील (global equity market) कमकुवत ट्रेंडमुळे शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात इक्विटी बेंचमार्क निर्देशांक (equity benchmark index) घसरला. बीएसईचा (BSE) 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स कमजोर सुरुवातीनंतर 236.59 अंकांनी घसरून 57,985.51 वर आला. एनएसईचा (NSE) निफ्टी 69.95 अंकांनी घसरून 17,261.85 वर आला.

Market Fall
बाजार घसरला

By

Published : Oct 7, 2022, 10:56 AM IST

मुंबई: जागतिक इक्विटी बाजारातील (global equity market) कमकुवत ट्रेंडमुळे शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात इक्विटी बेंचमार्क निर्देशांक (equity benchmark index) घसरला. बीएसईचा (BSE) 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स कमजोर सुरुवातीनंतर 236.59 अंकांनी घसरून 57,985.51 वर आला. एनएसईचा (NSE) निफ्टी 69.95 अंकांनी घसरून 17,261.85 वर आला.

इतर शेअर्सची स्थिती: ३० शेअर्सच्या सेन्सेक्स पॅकमध्ये इंडसइंड बँक, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स आणि आयटीसी ह्या कंपन्या सुरुवातीच्या व्यापारात पिछाडीवर होते. तर दुसरीकडे, टायटन, मारुती, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपन्या विजेते ठरले. आशियातील इतरत्र, टोकियो, शांघाय आणि हाँगकाँगमधील बाजारपेठा घसरणीला होत्या, तर सोल हिरव्या रंगात होते.

तज्ज्ञांचे मत: मेहता इक्विटीज लिमिटेडचे संशोधन विश्लेषक प्रशांत तपासे म्हणाले की, जागतिक निर्देशांकांवरील कमजोरीमुळे शुक्रवारच्या व्यापारात इक्विटी मार्केट्स नकारात्मक पूर्वाग्रहासह सावध प्रवृत्ती दर्शवू शकतात. यूएस सप्टेंबरच्या नोकऱ्यांचा अहवाल आज नंतर प्रसिद्ध होणार आहे. याकडे जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष असेल कारण यामुळे नजीकच्या काळातील बाजाराची दिशा निश्चित होईल.

"जागतिक स्तरावर बाजारावर प्रभाव टाकणारा महत्त्वाचा डेटा म्हणजे आज रात्री अपेक्षित असलेला यूएस नोकऱ्यांचा डेटा. एफआयआयने विक्री थांबवली आहे आणि खरेदीदार झाले आहेत, ही वस्तुस्थिती कमी प्रमाणात जरी असली तरी ती बाजारासाठी सकारात्मक आहे," असे जिओजित फायनान्शिअलचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही के विजयकुमार म्हणाले.

गुरुवारी अमेरिकेचे बाजार घसरले:गुरुवारी बीएसई बेंचमार्क 156.63 अंकांनी किंवा 0.27 टक्क्यांनी वाढून 58,222.10 वर स्थिरावला होता. निफ्टी मागील व्यवहारात 57.50 अंक किंवा 0.33 टक्क्यांनी वाढून 17,331.80 वर बंद झाला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्युचर्स 0.07 टक्क्यांनी घसरून 94.35 डॉलर प्रति बॅरल झाले. बीएसईकडे उपलब्ध आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी 279.01 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केल्यामुळे ते निव्वळ खरेदीदार होते.

ABOUT THE AUTHOR

...view details