महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार; बिहारमधून कुणाला मिळणार संधी?

सुशिल मोदी बिहार भाजपचे मोठे नेते आहेत. तेदेखील मंत्रिपदाचे दावेदार आहेत. जर त्यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात केला गेला तर बिहारला त्याचा फायदा होईल. तसेच सामाजिक समिकरणे पाहता दिवंगत रामविलास पासवान यांचे भाऊ पशुपति पारस यांच्यारुपाने मोठ्या दलित चेहऱ्याचाही विचार केला जाण्याची शक्यता असल्याचे रवि उपाध्याय यांनी सांगितले. तर भाजपचे प्रवक्ते विनोद शर्मा म्हणाले की, जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, तेव्हा अनेक जणांना संधी मिळेल. जेडीयूचा मागच्या वेळेत समावेश झाला नव्हता. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात जेडीयूचा समावेश करण्यात येईल. तर बिहार भाजपाचे नेते सुशिल मोदींनाही संधी देण्याची शक्यता आहे. बिहार भाजपच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांची इच्छा आहे की, सुशिल मोदींना केंद्रात मंत्रिपद मिळावे, असेही भाजप प्रवक्ते विनोद शर्मा यांनी सांगितले.

By

Published : Jun 15, 2021, 9:19 AM IST

many-contenders-from-bihar-in-the-expansion-of-modi-cabinet
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार

पाटणा (बिहार) -केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा आहे. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. बिहारमधूनही अनेक जण मंत्रिपदासाठी दावेदार आहेत. जनता दलही (संयुक्त) यावेळी मंत्रिमंडळात आपली दावा करत आहे. जेडीयूमधून ललन सिंह, आरसीपी सिंह आणि संतोष कुशवाहा यांच्या नावाची चर्चा आहे.

याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने माहिती देताना

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीआधी मंत्रिमंडळाचा विस्तार -

यावेळी सुशील मोदींसारखे भाजपामधील मोठे नेते मंत्रिपदाचे दावेदार आहेत. याशिवाय, लोक जनशक्ती पक्षातूनही एकाला मंत्रिपद दिले जाऊ शकते. भाजपचे लक्ष्य उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीवर आहे. तेथील सामाजिक समिकरणेही भाजपला लक्षात घ्यावे लागतील, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

मंत्रिमंडळात जेडीयू -

जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह म्हणत आहेत की, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात जेडीयूचा समावेश करण्यात येईल. मात्र, किती जणांना आणि कोणाकोणाला मंत्रिपद मिळेल, याबाबत बोलणे त्यांनी टाळले. ते म्हणाले, राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सर्वांचा सन्मान केला जातो.

जेडीयूचे दावेदार -

वरिष्ठ पत्रकार रवि उपाध्याय म्हणाले की, जेडीयूतून ललन सिंह, आरसीपी सिंह और संतोष कुशवाहा यांच्या नाव पुढे केले जाऊ शकते. ललन सिंह बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या जवळचे आहेत. त्यांच्या नावाची चर्चा खूप आधीपासून आहे. तर दुसरीकडे जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह हेदेखील केंद्रीय मंत्रिपदाचे दावेदार आहेत. नीतीश कुमार संतोष कुशवाहा यांनादेखील पक्षाकडून संधी देऊ शकतात, असेही ते म्हणाले.

सुशिल मोदी बिहार भाजपचे मोठे नेते आहेत. तेदेखील मंत्रिपदाचे दावेदार आहेत. जर त्यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात केला गेला तर बिहारला त्याचा फायदा होईल. तसेच सामाजिक समिकरणे पाहता दिवंगत रामविलास पासवान यांचे भाऊ पशुपति पारस यांच्यारुपाने मोठ्या दलित चेहऱ्याचाही विचार केला जाण्याची शक्यता असल्याचे रवि उपाध्याय यांनी सांगितले. तर भाजपचे प्रवक्ते विनोद शर्मा म्हणाले की, जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, तेव्हा अनेक जणांना संधी मिळेल. जेडीयूचा मागच्या वेळेत समावेश झाला नव्हता. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात जेडीयूचा समावेश करण्यात येईल. तर बिहार भाजपाचे नेते सुशिल मोदींनाही संधी देण्याची शक्यता आहे. बिहार भाजपच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांची इच्छा आहे की, सुशिल मोदींना केंद्रात मंत्रिपद मिळावे, असेही भाजप प्रवक्ते विनोद शर्मा यांनी सांगितले.

बिहारमध्ये भाजपचे 17 खासदार आहेत. यातील पपाच जणांना मंत्रिपद देण्यात आले आहे. तर जेडीयूचे 16 खासदार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात जेडीयूला यावेळी किती पदे मिळतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. जेडीयूला दोन ते तीन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

लोजपमधून कुणाला संधी मिळणार?

लोजपमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात पशुपति पार आणि चिराग पासवान यांच्यापैकी कोणाला संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जेडीयूच्या नेत्यांनी आधीच चिराग पासवान यांच्याप्रती आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, भाजप नेत्यांची चिराग पासवान यांच्या नावाला पसंती आहे, हे जगजाहीर आहे. मात्र, तरीही जेडीयूच्या नाराजीमुळे चिराग पासवान यांचा मंत्रिमंडळात समावेश करणे, हे भाजपसाठी सोपे नाही.

जेडीयू-भाजपचे जुने नाते -

जेडीयू आणि भाजप 2005पासून बिहारमध्ये सत्तेत आहेत. मात्र, वाजपेयी सरकार में जेडीयूला संख्याबळानुसार जागादेखील मिळाल्या होत्या. मात्र, 2014मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर जेव्हा सरकार बनले तेव्हा जेडीयू बिहारमध्ये भाजपसोबत नव्हती. तर 2017 मध्ये त्यांनी पुन्हा भाजपसोबत हातमिळवणी करत सरकार बनवले. मात्र, यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. यानंतर 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा बहुमत मिळाले. यावेळी जेडीयू केवळ एक मंत्रिपद देण्यात येत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details