नवी दिल्ली- यंदाचे संसदेचे पावसाळी (मान्सून) अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार आहे. तर १३ ऑगस्टला संपणार आहे. यामध्ये १९ दिवस कामकाजाचे दिवस असणार असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे.
कोरोना महामारीत संसदेचे हे दुसरे मान्सून अधिवेशन असणार आहे. सामान्यत: संसदेचे मान्सून अधिवेशन हे जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते. तर स्वातंत्र्यदिनापूर्वी संसदेचे मान्सून अधिवेशन संपते.
हेही वाचा-निसर्गाचा कहर; उत्तरप्रदेशमध्ये विविध ठिकाणी वीज कोसळून तब्बल 41 जणांचा मृत्यू
संसदीय व्यवहार समितीने अधिवेशनाच्या तारखाबाबत शिफारस केली होती. त्यानुसार १९ जुलैला लोकसभेचे मान्सून अधिवेशन सुरू होणार आहे. संसदेच्या अधिवेशनात कोरोनाच्या काळातील सर्व नियमांचे पालन केले जाणार असल्याचे सूत्राने सांगितले. संसदेच्या कॉम्पेक्समध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने लशीचा किमान एक तरी डोस घेतलेला असावा, असा विश्वासही सुत्राने व्यक्त केला आहे.