पाहा काय म्हणाले मनोज तिवारी रायपूर (छत्तीसगड) Manoj Tiwari : छत्तीसगडमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची धूम आहे. मंगळवारी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं. या टप्प्यात एकूण २० मतदारसंघांमध्ये मतदान झालं, ज्यापैकी १० मतदारसंघ नक्षल प्रभावित होते. दरम्यान, निवडणूक प्रचारासाठी राजधानी रायपूरमध्ये पोहोचलेले भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी सत्ताधारी काँग्रेसवर हल्लाबोल करताना एक मोठं वक्तव्य केलं.
काँग्रेस हमासला पाठिंबा देत आहे :मनोज तिवारी म्हणाले की, काँग्रेसला हे लपवायचं आहे की ते हमासच्या दहशतवाद्यांना पाठिंबा देतात. 'दहशतवादी येऊन लहान मुला-मुलींना मारतात. त्यांच्यावर बलात्कार करतात. हमासला पाठिंबा देणाऱ्यांची मानसिकता जाणून घ्या', असा आरोप मनोज तिवारींनी केला. याशिवाय त्यांनी काँग्रेसवर सनातन धर्म नष्ट केल्याचा आरोपही केला आहे.
गुन्हेगारांना काय इशारा दिला : खासदार मनोज तिवारी पुढे बोलताना म्हणाले, 'छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये गुन्हेगार गंभीर गुन्हे करतात आणि सहज पळून जातात. मात्र भाजपाच्या राजवटीत असं होऊ देणार नाही. भाजपाशासित राज्यात जर कोणी गुन्हा केला तर गुन्हेगाराच्या पुढच्या सात पिढ्यांना रडत बसावं लागेल', असा इशारा त्यांनी दिला आहे. 'यावेळी छत्तीसगडच्या जनतेनं कोणतीही चूक करू नये. पाच वर्षांपूर्वी इथल्या जनतेनं चूक केली, त्याचे परिणाम त्यांना पुढचे ५ वर्ष भोगावे लागले', असंही ते म्हणाले.
महादेव अॅपच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका : यावेळी बोलताना मनोज तिवारी यांनी महादेव अॅपच्या मुद्द्यावरून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली. 'राज्याला सत्तेत असताना जनतेची सेवा करणाऱ्या सरकारची गरज आहे, सत्तेत असताना जुगार खेळणाऱ्या सरकारची गरज नाही, असं मनोज तिवारी म्हणाले.
हेही वाचा :
- Chhattisgarh Election 2023 : येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झालं मतदान, आजही दिसतो नक्षल्यांचा प्रभाव
- Chhattisgarh Election 2023 : एक लाखांवर अंत्यसंस्कार करणारा अनोखा उमेदवार विधानसभा रिंगणात
- Chhattisgarh Election 2023 : तृतीय पंथीयांसाठी स्पेशल 'रेनबो मतदान केंद्र', निवडणूक आयोगाचा अभिनव उपक्रम