अहमदाबाद - डॉ. मनोज सोनी यांची ५ एप्रिल रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( UPSC chairman appointment ) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी प्रदीप कुमार जोशी हे लोकसेवा आयोगाचे ( Union Public Service Commission ) अध्यक्ष होते. डॉ. मनोज सोनी यांनी दोन विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून काम केले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत.
डॉ. मनोज यांचा १७ फेब्रुवारी १९६५ रोजी मुंबईत जन्म झाला. दुर्दैवाने इयत्ता पाचवीत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे वडील मुंबईच्या रस्त्यावर कपडे विकायचे. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाला आर्थिक मदत करण्याकरिता व शिक्षणासाठी त्यांनी अगरबत्ती विकायला सुरुवात केली. त्यानंतर 1978 मध्ये त्यांच्या आईने मुंबईहून गुजरातमधील आनंद येथे राहण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला.
मनोज हे बारावीच्या विज्ञान परीक्षेत नापास झाले. त्यानंतर मनोज यांनी राजरत्न पीटी पटेल कॉलेजमध्ये कला शाखेतून शिकण्याचा पर्याय निवडला. आंतरराष्ट्रीय संबंधमध्ये ( International Relations ) स्पेशलायझेशन असलेले राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत. आंतरराष्ट्रीय संबंधात डॉ मनोज यांनी सरदार पटेल विद्यापीठ ( Sardar Patel University ) व वल्लभ विद्यानगर येथून शिक्षण पूर्ण केले. डॉ मनोज सोनी यांनी एमएस विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे (BAOU) कुलगुरू म्हणून कामकाज पाहिले आहे. वयाच्या ४० व्या वर्षी, वडोदरा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाचे कुलगुरू ( youngest VC of the country ) झाल्यानंतर ते देशातील सर्वात तरुण कुलगुरू बनले.