महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Manipur Viral Video : मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढून बलात्कार; आरोपींच्या मुसक्या आवळण्याकरिता पोलिसांकडून प्रयत्न सुरू

मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची रस्त्यावर धिंड काढल्याच्या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सामूहिक बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती थौबलचे पोलीस अधीक्षक के मेघचंद्र यांनी सांगितले आहे.

Manipur Viral Video
संपादित छायाचित्र

By

Published : Jul 20, 2023, 8:23 AM IST

Updated : Jul 20, 2023, 9:20 AM IST

इम्फाळ :मणिपूरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून जाळपोळ आणि अत्याचाराच्या घटनांचे सत्र सुरू असल्याने मोठी दहशत पसरली आहे. मणिपूर येथील दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांच्यावर समाजकंटक अत्याचार करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रकरणी थौबल जिल्ह्यातील नॉनगपोक सेकमाई पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक के मेघचंद्र यांनी या समाजकंटकांना तात्काळ अटक करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचेही के मेघचंद्र यांनी जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

दोन महिलांवर रस्त्यावर लैंगिक अत्याचार :मणिपूरमध्ये 4 मे रोजी दोन महिलांना विवस्त्र करत समाजकंटक अत्याचार करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांच्यावर समाज कंटक अत्याचार करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. देशभरातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. दोन महिलांवर समाजकंटकांनी अत्याचार केल्यानंतर केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांसह राज्य पोलीस दलातील जवानांनीही शोधमोहीम सुरू आहे. या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांना शस्त्रात्रे आणि दोन मासिके आडळून आली आहे. इम्फाळ पूर्व जिल्हा पोलिसांनी हे साहित्य जप्त केले आहे.

केंद्रीय स्मृती इराणी यांनी केली निंदा :केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनीही मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेची निंदा केली आहे. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर कथित व्हिडिओवर स्मृती इराणी यांनी प्रतिक्रिया दिली. स्मृती इराणी यांनी ट्विटरमध्ये म्हटले, की मणिपूरमध्ये 2 महिलांच्या लैंगिक अत्याचाराचा भयानक व्हिडिओ निंदनीय आणि अत्यंत अमानवी आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्याशी याबाबत बोलले आहे. त्यांनी सध्या तपास सुरू असून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नसल्याचे आश्वासन दिले आहे, असे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -

  1. Manipur Violence : मणिपूरच्या शांततेसाठी कुकी समाजातील महिलांचे अमित शाहांच्या घराबाहेर निदर्शने
  2. Manipur Violence : मणिपुरात हिंसाचार सुरुच, कुकी अतिरेक्यांनी केली दोघांसह रिलीफ कॅम्पमधील विद्यार्थ्याची हत्या
Last Updated : Jul 20, 2023, 9:20 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details