इम्फाळ:मणिपूरमध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांपासून हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. येथील जातीय हिंसाचाराची आग अजून शांत झालेली नाही. शनिवारी संध्याकाळी इम्फाळ जिल्ह्यात हिंसाचार झाल्याची घटना घडली आहे. इम्फाळ जिल्ह्यातील लंगोल गेम्स गावात आगीकांड झाल्याची घटना समोर आली आहे. एका जमावाने या गावातील 15 घरांना आग लावली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.
पोलिसांनी दिली माहिती: शनिवारी झालेल्या हिंसेत एका व्यक्तीच्या डाव्या मांडीला गोळी लागली आहे. या व्यक्तीला रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) मध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या या व्यक्तीची परिस्थती स्थिर असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात सुरक्षा दलाकडून अश्रुधुरांचा गोळीबार करण्यात आला असून सध्या तेथील परिस्थितीत सुधारणा झाली आहे.
का घडला हिंसाचार: शनिवारी 27 विधानसभा मतदारसंघाच्या समन्वय समितीने 24 तासांसाठी साधारण संप पुकारला होता. या संपादरम्यान हिंसाचाराच्या घटना घडल्या. इम्फाळ जिल्ह्यातील पूर्व भागात असलेल्या चेकॉन परिसरातही हिंसाचार झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. शनिवारी जमावाने एका दुकानाला आग लावली. त्यानंतर या जमावाने दुकानांच्या बाजुला असलेली घरेही जाळली. पोलिसांना याची मिळाल्यानंतर सुरक्षा दल तेथे दाखल झाले. घरांना लावण्यात आलेली आग शमवण्यासाठी पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. दरम्यान रविवारी येथील परिस्थितीत सुधारणा झाली. परंतु काही भागांमध्ये प्रशासनाकडून निर्बंध कायम ठेवण्यात आली आहेत. त्याआधी शुक्रवारी मध्यरात्री बिष्णुपूर जिल्ह्यात एका वृद्ध व्यक्तीसह त्याच्या मुलाचा खून झाला होता.
गावात गोळीबार: क्वाक्ता लामखाई गावात काही समाजकंटकांनी बंदुका आणि तलवारीने हल्ला केला होता. गावात अंदाधुंद गोळीबार समाजकंटकांकडून करण्यात आला होता. यात तीनजण ठार झाले. समाजकंटकांनी दोन गावकऱ्याचे अपहरण केल्याचे सांगितले जात आहे. समाजकंटकांनी गोळीबार केल्यानंतर गावातील इतर नागरिक गावातून पळून गेले आहेत. दरम्यान गावात हल्ल्याची मिळाताच सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींची पोलिसांनी ओळख पटवली. युम्नाम पिशाक मैतेई (वय ६७) आणि त्यांचा मुलगा युम्नाम प्रेमकुमार मैतेई (वय ३९) आणि शेजारी युम्नाम जितेन मैतेई (वय ४६), असे हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. दरम्यान मे महिन्यात मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू झाला आहे. अजूनही येथील शहर, गावं, या हिंसाचाराच्या आगीत जळत आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत 160 लोकांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा-
- Manipur Violence : मणिपूरात पुन्हा हिंसाचार उफाळला, तिघांची हत्या करून तलवारीने शिरच्छेद, परिस्थिती गंभीर
- Manipur Violence : मणिपूर घटनेवरून सर्वोच्च न्यायालय संतप्त, 'तीन महिने झाले..वेळ निघून चालली..',