नवी दिल्ली :मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी रविवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली आणि त्यांना मणिपुरमधील ईशान्येकडील राज्यातील सद्यस्थितीची माहिती दिली. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. सध्या मणिपूरची स्थिती बिकट झाली आहे.
गृहमंत्र्यांना दिली माहिती - मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह us रविवारी सकाळी इंफाळहून दिल्लीत पोहोचले होते. त्यानंतर रविवारी दुपारी सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना मणिपूरमधील सद्यस्थिती आणि तेथील स्थिती पूर्ववत करण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती दिली.
गृहमंत्र्यांची सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा - शनिवारी केंद्रीय गृहमंत्र्यांनी मणिपूरमधील परिस्थितीवर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. तीन तास चाललेल्या या बैठकीत 18 राजकीय पक्ष, ईशान्येकडील चार खासदार आणि प्रदेशाचे दोन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यानंतर लगेच रविवारी मुख्यमंत्र्यांनी अमित शाह यांची भेट घेत माहिती दिली.