महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Raped On 5 Years Girl In MP : पाच वर्षीय चिमुकलीवर तुरुंगातून सुटलेल्या नराधमाचा अत्याचार, पीडिता गंभीर - Raped On 5 Years Girl In MP

पाच वर्षीय चिमुकलीवर 30 वर्षीय नराधमानं अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना मध्य प्रदेशातील सतनात घडली असून पोलिसांनी अत्याचारी नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या नराधमानं या अगोदरही चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला होता. त्यामुळे त्याला 10 वर्षाची शिक्षाही न्यायालयाने ठोठावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Raped On 5 Years Girl In MP
पीडितेला रुग्णालयात नेताना पोलीस

By

Published : Aug 18, 2023, 12:00 PM IST

भोपाळ : कारागृहातून सुटून आलेल्या नराधमानं पाच वर्षीय चिमुकलीला आपल्या वासनेची शिकार बनवल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना मध्य प्रदेशातील सतना इथं घडली आहे. नराधमाच्या अत्याचारामुळे पाच वर्षीय चिमुकली गंभीर झाल्यानं तिला उपचारासाठी रिवा येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या घटनेतील नराधमानं यापूर्वीही चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्यामुळे त्याला 10 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र नुकताच तो कारागृहातून सुटून आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी या नराधमाला ताब्यात घेऊन त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

चिमुकलीला बहाण्यानं गेला घेऊन : या घटनेतील पाच वर्षीय चिमुकलीला या नराधमानं बहाण्यानं आपल्या सोबत नेलं होतं. यावेळी त्यानं जगतदेव तलावाच्या परिसरात नेत तिच्यावर अत्याचार केले. अत्याचार केल्यानंतर त्यानं पीडितेला या परिसरात सोडून पोबारा केला. मात्र वेदनेनं आक्रोश करणाऱ्या चिमुकलीची परिस्थिती नाजुक झाल्यानं ही घटना उघडकीस आली. त्यामुळे चिमुकलीला अगोदर सतना आणि त्यानंतर रिवा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं.

शिवमंदिर परिसरात पीडितेचे आई-वडील मागतात भिक्षा :या घटनेतील पीडित चिमुकलीचे आई वडील जगतदेव तलावाच्या जवळ असलेल्या शिव मंदिर परिसरात भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करतात. त्यामुळे ही चिमुकली या परिसरात खेळत होती. मात्र कारागृहातून सुटून आलेल्या 30 वर्षीय नराधमानं या पीडित चिमुकलीवर अत्याचार केले. नराधमाच्या अत्याचारामुळे या चिमुकलीची परिस्थिती अत्यंत नाजुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अत्याचाराच्या आरोपावरुनच होता तुरुंगात : या घटनेतील 30 वर्षीय नराधम या अगोदरही चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात कारागृहात होता. नुकताच तो कारागृहातून सुटून आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी पुन्हा नराधमाला अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती सतना पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Nagpur Girl Rape Case : औषध लावण्याच्या बहाणाने अल्पवयीन मुलीवर 63 वर्षीय नराधमाचा अत्याचार; 'असे' फुटले बिंग
  2. Minor Girl Rape Case: चॉकलेटच्या आमिषाने चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; कराड न्यायालयाने आरोपीस ठोठावली फाशीची शिक्षा

ABOUT THE AUTHOR

...view details