महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तांत्रिकाच्या बोलण्याला फसून स्वतःच्या मुलीची हत्या केल्या प्रकरणी एकाला अटक केली

वृत्तानुसार, एका तांत्रिकाने आरोपीला सांगितले की, त्याच्या घराच्या खाली खजिना पुरलेला आहे आणि तो खजिना कोठे आहे, हे शोधण्यासाठी त्याला आपल्या मुलीवर एक अनुष्ठान करावे लागेल. जेव्हा मुलीच्या आईने तिच्या पतीला रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने तिच्यावरही हल्ला करत तिला मारहाण केली.

उत्तर प्रदेश बाराबंकी क्राईम न्यूज
उत्तर प्रदेश बाराबंकी क्राईम न्यूज

By

Published : Nov 6, 2020, 2:15 PM IST

बाराबंकी - उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एक वेदनादायक घटना उघडकीस आली आहे. जिथे एका बापाने तांत्रिकाच्या बोलण्याला फसून स्वतःच्या

दहा वर्षाच्या मुलीला मारून मारून तिची हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह घरातच पुरला. बाराबंकीच्या खुर्द मऊ गावात बुधवारी ही घटना घडली.

वृत्तानुसार, एका तांत्रिकाने आरोपीला सांगितले की, त्याच्या घराच्या खाली खजिना पुरलेला आहे आणि तो खजिना कोठे आहे, हे शोधण्यासाठी त्याला आपल्या मुलीवर एक अनुष्ठान करावे लागेल. जेव्हा मुलीच्या आईने तिच्या पतीला रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने तिच्यावरही हल्ला करत तिला मारहाण केली.

मृत मुलीच्या आजीने (आईची आई) या प्रकाराची पोलिसांना माहिती दिल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

हेही वाचा -पैशांवर खेळल्या जाणाऱ्या ऑनलाईन गेम्सना तामिळनाडूमध्ये बंदी

पोलिसांनी मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनादरम्यान मुलीच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक जखमा सापडल्या.

'आलम नावाच्या व्यक्तीने आपल्या मुलीला जबरदस्त मारहाण केली. या भयंकर मारहाणीमुळे मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांना न कळवता त्याने तिचा मृतदेह पुरला,' असे बाराबंकीचे पोलीस अधीक्षक अरविंद चतुर्वेदी म्हणाले.

चतुर्वेदी म्हणाले, 'या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. पुढील तपास सुरू असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.'

हेही वाचा -अहमदाबाद कारखान्यात मोठा स्फोट, मृतांचा आकडा 12 वर; मुख्यमंत्र्यांनी केली मदत जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details