कोलकाता -पश्चिम बंगालमध्ये येत्या काही दिवसांमध्ये निवडणुकांचा बार उडणार आहे. राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कंबर कसली आहे. यातच ममता यांनी आपल्या राजकीय धावपळीतून वेळ काढत बुधवारी कोलकात्यामध्ये आयोजित एका बंगला संगीत कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमामध्ये ममता बॅनर्जी यांनी कलाकारांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी ममता बॅनर्जी यांनी स्टेजवरच कलाकारांसोबत ठेका धरला. त्यांच एक वेगळ रूप कार्यक्रमात पाहायला मिळालं.
ममता बॅनर्जी यांनी संगीतकार, गायक आणि नृत्य कलाकारांसह अनेक लोक कलाकारांचा गौरव केला. कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी थाली नृत्यांगना बसंती हेम्ब्रम यांचा सन्मानही केला. यावेळी बसंती यांच्या विनंतीचा मान राखत, बॅनर्जी यांनी स्टेजवर नृत्य केले. मात्र, यावेळी त्यांनी भाजपाला लक्ष्य करण्याचे सोडले नाही. मंचावरून आपल्या भाषणात त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
यावेळी भाजपाचे नाव घेता, ममतांनी आपल्या भाषणातून टीका केली. भाजपा आपले गुजरात मॉडेल बंगालमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, असे होणार नाही. बंगालने देशाला राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत आणि जय हिंद तिन्ही गोष्टी दिल्या आहे. नेताजींनी जय हिंदचा नारा दिला. किम चंद्र यांनी वंदे मातरम् दिलं आणि रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीत दिल. हे सर्व जण बंगालचेच आहेत. बंगलाला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तरही एक दिवस संपूर्ण जग बंगालला सलाम करेल. बंगालची भूमी जीवनाचे स्रोत आहे, असे ममता म्हणाल्या.
मोदींची ममता बॅनर्जींवर टीका -
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना राज्यात लागू केली नाही. यावरून मोदींनी ममतांवर टीका केली. पश्चिम बंगालमधील 70 लाखाहून अधिक शेतकरी बंधू व भगिनींना हा लाभ मिळू शकलेला नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बंगालच्या 23 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. परंतु राज्य सरकारने पडताळणी प्रक्रिया इतक्या दिवसांपासून थांबविली आहे.