कोची (केरळ)-केरळ उच्च न्यायालयाने बुधवारी मल्याळम अभिनेता-निर्माता विजय बाबूला त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती बेचू कुरियन थॉमस यांनी बाबू याला (27 जून ते 3 जुलै) या कालावधीत पोलिसांसमोर हजर राहणे, अभिनेत्री-पीडित किंवा तिच्या कुटुंबीयांना धमकी धमकी न देणे, केरळ सोडणार नाही अशा अटींवर हा जामीन मंजूर केला होता. न्यायालयाने त्याला 5 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामिन मंजूर केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्टाने त्याला 31 मे रोजी अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते आणि तेव्हापासून वेळोवेळी ती वाढवली जात होती. आपल्या याचिकेत बाबूने आपल्याला ब्लॅकमेल करण्यासाठी आपल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला होता. एका महिला अभिनेत्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आणि फेसबुक लाईव्ह सेशनद्वारे पीडितेची ओळख उघड केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.