Todays Top News : आज राज्यासह देशभरात काय घडणार, जाणून घ्या एकाच क्लिकवर - Prime Minister Modi
सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अनिल देशमुखांनी ( Anil Deshmukh ) दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज हायकोर्ट निकाल जाहीर करणार आहे. शिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज व्हर्च्युअल रॅली होणार आहे. तर भूपेंद्र पटेल ( Bhupendra Patel ) आज पुन्हा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.अशाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. ( Read Top News Today )
मुंबई : निवडणूक चिन्हाच्या लढाईत आज आयोगासमोर युक्तिवाद सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या लढाईला सुरुवात होईल. याबरोबरच सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अनिल देशमुखांनी ( Anil Deshmukh ) दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज हायकोर्ट निकाल जाहीर करणार आहे. शिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या वाढदिवसानिमित्त आज व्हर्च्युअल रॅली होणार आहे. तर भूपेंद्र पटेल ( Bhupendra Patel ) आज पुन्हा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.अशाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. ( Read Top News Today )
- शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या लढाई :निवडणूक चिन्हाच्या लढाईत आज आयोगासमोर युक्तिवाद सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या लढाईला सुरुवात होईल. धनुष्यबाणावर दावा करण्यासाठी कागदपत्रांच्या लढाईनंतर प्रत्यक्ष युक्तिवाद सुरू होणार आहे.
- अनिल देशमुखांना जेल की बेल? :सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अनिल देशमुखांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज हायकोर्ट निकाल जाहीर करणार आहे.
- पुण्यात संघटनांकडून रिक्षा बंद आंदोलन :दुचाकीवरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात यावी यासाठी पुण्यातील काही रिक्षा संघटनांकडून आज रिक्षा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. रिक्षा बंदमधे सहभागी असलेले रिक्षाचालक 11 वाजता आर टी ओ कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलन करणार आहेत.
- महामोर्च्याच्या नियोजनासाठी ठाकरे गटाची बैठक :ठाकरे गटाच्या शिवसेनेची आज महामोर्च्याच्या नियोजनासाठी बैठक होणार आहे. बैठकीत मोर्च्याचा मार्ग अंतिम करण्यात येणार आहे.
- शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज होणार व्हर्च्युअल रॅली :राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज व्हर्च्युअल रॅली होणार आहे. वाय. बी. चव्हाण सेंटर येथून शरद पवार यांच्या हस्ते या व्हर्च्युअल रॅलीचा शुभारंभ होणार आहे. काही नेते आपल्या जिल्ह्यातून रॅलीत सहभागी होणार आहेत.
- भूपेंद्र पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार :भूपेंद्र पटेल आज पुन्हा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान मोदी,( Prime Minister Modi ) अमित शाह आणि एकनाथ शिंदेंसह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहतील.
- ईडीच्या याचिकेवर सुनावणी :पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी.
- गौतम नवलखा यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी :शहरी नक्षलवाद प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी गौतम नवलखा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी.
- वेंगुर्ले मराठी साहित्य संमेलन : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले मराठी साहित्य संमेलन आज होत आहे. या साहित्य संमेलनाची सुरवात ग्रंथदिंडीने करण्यात येणार आहे. पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा शुभारंभ होईल.
- हिंगोलीत शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा :ठाकरे गटाच्या वतीने कळमनुरी तहसील कार्यालयावर दे दणका मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आणि शिवसैनिक सहभागी होणार आहेत.
- चंद्रशेखर बावनकुळेंची हिंगोलीत पत्रकार परिषद :भाजपचे प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळेंची पत्रकार परिषद होणार आहे बावनकुळे आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या विविध बैठका आणि आढावा घेतला जाणार आहे.