मुंबई: मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांचा एक मोठा गट फोडत महाराष्ट्र सोडला. तेव्हा पासुन महाराष्ट्रात राजकीय भुकंप आला आहे. महाविकास आघाडी सरकार तर अडचणीत आले आहे. पण त्या सोबत शिवसेनेच्या अस्तीत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 1992 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पण अशाच घटनेचा मोठ्या शिताफीने सामना केला होता. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला त्या संकटातुन शिताफीने बाहेर काढले होते. शिवसेनेत असे अनेक वादळे आली पण शिवसेनेने त्यांचा सामना केला. यावेळी पुन्हा शिवसेने समोर मोठे संकट उभा राहिले आहे.
उध्दव ठाकरेंची भावणीक साद: चार दिवसांपासुन सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर उध्दव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आणि बाळासाहेबांनी ज्या प्रमाणे 1992 मधे भावणीक साद घातली होती तशीच साद घातली. त्यांच्यासाठी पक्ष ही प्राथमीकता आहे मुख्यमंत्री पद नाही. आणि ते सोडण्याची तयारीही त्यांनी जाहिरपणे व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात वापस येऊन बोला असे आवाहन केले. उध्दव यांच्या आवाहना नंतरही शिवसेनेच्या आमदारांचा शिंदें कडे जाण्याचा ओघ कमी झालेला नाही.
त्यांच्या सोबत जायचे असेल तर जा: उद्धव ठाकरे शुक्रवारी राज्यातील सर्व जिल्हा आणि संपर्क प्रमुख यांची बैठक बोलावली होती. यावेळी बोलताना, माझ्या प्रेमात अडकू नका, मी ब्लॅक मेल करत नाही, हे भावनिक आवाहन नाही. तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे असेल तर सोबत जा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. सेना स्थापन झाली त्यावेळची वेळ आता आली आहे. मला पुन्हा नव्याने शिवसेना उभी करायची आहे. सडकी पाने गळून पडली की नवी पालवी फुटते. जिद्द असेल तर सोबत राहा नाहीतर निघून जा. ज्या भाजपाने आरोप केले आणि कूटनीती केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या आवाहनानंतर शिवसेना उभारी घेणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.