उदयपूर (राजस्थान) : महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रविवारी राजस्थानातील उदयपूर येथे कन्हैयालाल यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आर्थिक मदत केली. यादरम्यान, ईटीव्ही भारतशी विशेष संवाद साधताना मंत्री म्हणाले की, हे अत्यंत घृणास्पद हत्याकांड आहे. या हत्याकांडानंतर एका हसऱ्या कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला. उदयपूरच्या घटनेत कन्हैयालालच्या कुटुंबाचा कोणताही दोष नसल्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. नुसती सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्याला कोणी एवढ्या क्रूरतेने मारेल याची कल्पनाही करू शकत नाही. समाजातील प्रत्येक व्यक्ती या निर्दयी खून प्रकरणाचा तीव्र निषेध करतो.
हत्येने कुटुंबाचा आनंद हिरावून घेतला :कुटुंबाला भेटताना नातेवाईकांनी व्यक्त केलेल्या वेदना शब्दात सांगता येणार नाहीत, असे पर्यटनमंत्र्यांनी सांगितले. कन्हैयाच्या कुटुंबात लहान मुले आहेत. त्यांची पत्नी अजूनही या वेदनातून बाहेर पडू शकलेली नाही. केंद्र सरकार आणि एनआयएची टीम या प्रकरणाच्या तपासात गुंतलेली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रत्येकाने सतर्क राहावे.
कन्हैयालालची निर्घृण हत्या : ते म्हणाले की, कन्हैयालाल हे अत्यंत साध्या कुटुंबातील होते. त्यांचे टेलरिंगचे छोटेसे दुकान होते. मंत्र्यांनी सांगितले की, कन्हैयालालची अशा प्रकारे निर्घृण हत्या करण्यात आली की लोकांमध्ये दहशत पसरवली जाईल. ही घटना घडवून आणणाऱ्या नराधमांनी या घटनेचा व्हिडीओ बनवून स्वतःला तीस मार खान असल्याचे सिद्ध करण्यासाठी अशी घटना घडवून आणली.
कन्हैयाचा मुलगा यश यालाही समजावले : कन्हैयालालचा मुलगा यश याने आपल्या वडिलांच्या मृत्यूपासून मारेकऱ्यांना फाशी होईपर्यंत अनवाणीच राहण्याची शपथ घेतली आहे. या कडाक्याच्या थंडीत कन्हैयाचा मुलगा यश अनवाणी आपले काम करत आहे. याबाबत मंत्री म्हणाले की, या प्रकरणी न्याय मिळवण्यासाठीचा लढा मोठा आहे.