महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी करणार आयएएस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन - महाराष्ट्र राज्यपाल मसूरी दौरा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उत्तराखंडामधील मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ अ‌ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये आयएएस अधिकाऱ्यांच्या सांगता समारोपाला उपस्थित राहणार आहेत.

bhagat singh koshyari
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

By

Published : Feb 12, 2021, 8:42 AM IST

देहराडून - महाराष्ट्राचे राज्यपाल आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंग कोश्यारी आज मसूरी दौऱ्यावर आहेत. सकाळी 9 वाजून 40 मिनिटांनी ते लाल बहादुर शास्त्री अकादमीमध्ये पोहचतील. तिथे ते प्रशिक्षण घेणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांच्या सांगता समारोपासाठी उपस्थित राहणार आहेत.

आयएएस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ते त्यांना विविध विषयांबाबत मार्गदर्शन देखील करणार आहेत. राज्यापाल कोश्यारी एक तास अकादमीमध्ये थांबणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर ते मसूरीतील सवाय हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

दुपारी 12 वाजता कडक सुरक्षेत ते देहराडूनला रवाना होतील. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या मसूरी दौऱ्यासाठी कडक सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी मनीष कुमार यांनी स्वत:ही जबाबदारी सांभाळली आहे. यादरम्यान भगत सिंग कोश्यारी यांच्या सोबत उत्तराखंडचे राज्यपाल बेबी रानी मौर्यसुद्धा असणार आहेत.

उत्तराखंड दौरा आहे वादात -

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उत्तराखंडामधील मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ अ‌ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये आयएएस अधिकाऱ्यांच्या सांगता समारोपाला उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्यांचा हा दौरा वादात सापडला आहे. ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे राज्यपाल १० फेब्रुवारीला सकाळी मुंबई विमानतळावर पोहोचले. मात्र, सरकारी विमान प्रवासाला परवानगी नसल्याने त्यांना पुन्हा राजभवनात परतावे लागले. या प्रकारावरून भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. शिवसेनेकडूनही राज्यपाल विमान प्रवासावर तिरकस प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. यावर राज्यपाल कोश्यारी यांनी प्रतिक्रिया देताना, सरकारी विमान न मिळाल्याने आपण खासगी विमानाने आलो, असे म्हटले आहे. यावर आता राज्य सरकार काय प्रतिउत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details