नवी दिल्ली-महाराष्ट्राचे भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी दिल्लीचे शैक्षणिक मॉडेल महाराष्ट्रातील शाळांमध्ये आणणार असल्याचे सांगितले.
भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री चिराग एन्क्लेव्हमधील कौटिल्य सर्वोदय बाल विद्यालय आणि कालकाजीमधील स्कूल ऑफ एक्सेलन्सला भेट दिली. या सरकारी शाळांमधील आंत्रेप्रेन्युरशिपचा अभ्यासक्रम राज्यमंत्री बनसोडे यांनी जाणून घेतला.
राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी बिझनेस ब्लास्टर विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तसेच अभ्यासक्रमाविषयी जाणून घेतले. यावेळी त्यांनी सरकारी शाळांमध्ये चालणाऱ्या देशभक्ती अभ्यासक्रम आणि स्कूल ऑफ स्पेशलाईज्ड एज्युकेशन मॉडेलची माहिती घेतली. दिल्ली सरकारकडून राबविण्यात येणारे शैक्षणिक मॉडेल महाराष्ट्रातील संपूर्ण शाळांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी महाराष्ट्र सरकारला मदत करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. एकमेकांपासून शिकत आपण देशातील शिक्षण व्यवस्था अधिक चांगले करू, असेही सिसोदिया यांनी म्हटले.
हेही वाचा-भाजप, आरएसएसकडून होणारा खोटा प्रचार रोखण्यासाठी आपल्याला एकजुटीने लढणे गरजेचे -सोनिया गांधी