महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra couple caught : महाराष्ट्रीयन जोडप्याला केरळमध्ये 1 कोटी रोख रकमेसह ताब्यात; हवालाची रक्कम असल्याचा संशय

By

Published : Apr 25, 2022, 5:45 PM IST

Updated : Apr 25, 2022, 7:11 PM IST

कोईम्बतूरहून मलप्पुरममधील वेंगारा ( Hawala money in Vengara ) येथे पैसे आणले जात असल्याची पोलिसांना माहितीच्या मिळाली होती. पोलिस पथकाने या जोडप्याची कार अडवली. त्यांना कारच्या सीटच्या आत असलेल्या गुप्त चेंबरमध्ये रोख आणि दागिने लपवून ठेवलेले सापडले. जोडप्याकडे 500, 200 आणि 100 च्या चलनी नोटा ( MH couple arrested in Kerala ) होत्या.

Maharashtra couple caugh
केरळमध्ये 1 कोटी रोख रकमेसह सोने जप्त

मलप्पुरम ( केरळ ) - महाराष्ट्रातील एका जोडप्याला मलप्पुरमच्या वलंचेरी येथे 1 कोटींहून अधिक रोख आणि सोन्याच्या 117 दागिन्यांसह ( 1 crore cash seize in Kerala ) पकडण्यात आले. दाम्पत्याकडे मौल्यवान वस्तूंबाबतची व रोख रकमेबाबत कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे पोलिसांनी रोख रकमेसह दागिने जप्त केले ( Valanchery police arrest MH couple ) आहेत.

कोईम्बतूरहून मलप्पुरममधील वेंगारा ( Hawala money in Vengara ) येथे पैसे आणले जात असल्याची पोलिसांना माहितीच्या मिळाली होती. पोलिस पथकाने या जोडप्याची कार अडवली. त्यांना कारच्या सीटच्या आत असलेल्या गुप्त चेंबरमध्ये रोख आणि दागिने लपवून ठेवलेले सापडले. जोडप्याकडे 500, 200 आणि 100 च्या चलनी नोटा ( MH couple arrested in Kerala ) होत्या. पोलिसांनी सांगितले की, तानाजी माऊली आणि त्यांची पत्नी अर्जना यांना ताब्यात घेतले आहे. दोघेही मूळ महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. पुढील तपास सुरू आहे.

कारच्या सीटमध्ये लपविलेले पैसे व दागिने

वलंचेरी पोलिसांची कामगिरी- दरम्यान, केरळ राज्यात सर्वाधिक हवालाची रक्कम पकडल्याचा विक्रम वलंचेरी पोलिसांनी नोंदवला आहे. सहा गुन्ह्यांमध्ये वलंचेरी पोलिसांनी ( Valanchery polic ) 8 कोटी रुपये जप्त केले आहेत.

Last Updated : Apr 25, 2022, 7:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details