महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Breaking news अंधेरी स्थानकावर लिफ्टमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका - ठळक घडामोडी

Breaking news
Breaking news

By

Published : Aug 26, 2022, 10:25 AM IST

Updated : Aug 26, 2022, 10:47 PM IST

22:46 August 26

अंधेरी स्थानकावर लिफ्टमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी रेल्वे स्थानकावर असलेल्या लिफ्टमध्ये तांत्रिक बिघड झाल्याने 15 प्रवासी अडकून पडलेले होते. प्रवाशांनी आरडाओरड केल्यानंतर तब्बल 20 मिनिटानंतर प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये एका गरोदर महिलेचा समावेश असून ती जखमी झाली आहे. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान अंधेरी स्थानकातील या घटनेमुळे अंधेरी स्थानकांवर चांगलाच गोंधळ उडालेला होता.

20:56 August 26

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे केला ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून मनसैनिकांना आवाहन

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या नोंदणीसाठी एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून मनसैनिकांना आवाहन केले आहे. यात मनसे पक्षाची सदस्य नोंदणी कशी करावी? याबाबत संपूर्ण प्रक्रिया ठाकरेंनी सांगितले आहे. शिवाय महाराष्ट्रातील तमान तरुणांना सदस्य होण्याबाबत आवाहन केले आहे.

19:38 August 26

अंधेरी रेल्वे स्थानकात लिफ्टमध्ये अडकल्या महिला

मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकात लिफ्टमध्ये काही महिला अडकल्याची माहिती समोर आली आहे.

18:38 August 26

राज्यभरात बैलपोळा सण उत्साहात साजरा

पोळा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सण मानला जातो. या दिवशी शेतकरी आपल्या सर्जा राजाची पूजा करतो. दरवर्षी महाराष्ट्रात मोठा उत्साहात साजरा केला जातो. यंदाही बैलपोळा गावोगावी उत्साहात पार पडला.

17:09 August 26

सोनाली फोगाटचा शेवटचा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी नवीन खुलासा Sonali Phogat Death Case समोर आला आहे. सोनाली फोगाटचे दोन सहकारी सुखविंदर सिंग आणि सुधीर सांगवान यांनीच तिला बळजबरीने गोव्यातील एका क्लबमध्ये बळजबरीने ड्रिंक पाजले व त्यामध्ये त्यांनी विषारी रसायन टाकले असल्याची माहिती गोव्याचे आयजीपी ओमवीर सिंग बिश्नोई यांनी दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. नुकताच एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.

16:13 August 26

माजी गृहमंत्री अनिल देशमुख कारागृहात चक्कर येऊन कोसळले, उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अचानक ऑर्थर रोड कारागृहात चक्कर आली आणि ते खाली कोसळले. यानंतर त्यांना उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

15:56 August 26

प्रो कबड्डी लीगचा ९ वा सीझन ७ ऑक्टोबरपासून

प्रो कबड्डी लीगचा ९ वा सीझन ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या सिझनची प्रेक्षकही वाट पाहत आहे.

15:27 August 26

गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ जम्मू काश्मीरमधील चार माजी मंत्र्यांचा दिला काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा

गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ जम्मू काश्मीरमधील चार माजी मंत्र्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. जीएम सरोरी, हाजी अब्दुल रशीद, मोहम्मद अमीन भट, गुलजार अहमद वाणी आणि चौधरी मोहम्मद अक्रम, अशी या नेत्यांची नावे आहे.

14:46 August 26

अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे सोनाली फोगट यांचा मृत्यू, प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर

अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे सोनाली फोगट यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, फोगाट यांच्या समवेत असणारे दोन सहकारी सुधीर पाल व सुखविंदर संगवान यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

11:58 August 26

ठाण्यातील आनंद मठ येथे आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

ठाण्यातील आनंद मठ येथे आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवसेना नेते, पदाधिकारी व सामान्य नागरिक भेट देत अभिवादन करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आनंद मठ येथे दर्शनासाठी येणार आहेत. एकनाथ शिंदे गटातील व उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिक आनंद मठ येथे दर्शनासाठी येणार आहेत. या ठिकाणी कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे.

11:30 August 26

गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसला रामराम

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला.

10:52 August 26

सावन कुमार टाक यांचे पार्थिव रुग्णालयातून मुंबईतील त्यांच्या जुहू येथील घरी

सावन कुमार टाक यांचे पार्थिव रुग्णालयातून मुंबईतील त्यांच्या जुहू येथील घरी

चित्रपट निर्माते सावन कुमार टाक यांचे पार्थिव रुग्णालयातून मुंबईतील त्यांच्या जुहू येथील घरी पोहोचले आहे. सावन कुमार यांची अखेरची यात्रा सकाळी 11 वाजता निघेल. जुहूच्या दक्षिणा पार्कमधील त्यांच्या घरी आप्तेष्ट पाहुणे येऊ लागले आहेत. पवन हंस स्मशानभूमीत 12 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काल, गुरुवार 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांचे निधन झाले.

10:25 August 26

नांदेड जिल्ह्यात 54 शिक्षकांवर कारवाई

सकाळी नांदेड जिल्ह्यात 54 शिक्षकांवर कारवाई झाली.

10:19 August 26

गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ जम्मू काश्मीरमधील चार माजी मंत्र्यांचा दिला काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा

कोल्हापूरआयकर विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्जुनवाडमध्ये छापा. साखर कारखान्याच्या भागीदारीवरून आयकर विभागाकडून कसून चौकशी सुरू. सोलापूर, पंढरपूर सह अन्य ठिकाणी साखर कारखान्यांवर पडलेल्या छाप्यांच्या साखळीत कोल्हापुरातील भागीदाराच्या निवासस्थानावर छापा. आयकर विभागाकडून घरातील सर्व कागदपत्रांची झाडाझडती सुरू.

Last Updated : Aug 26, 2022, 10:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details