महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sana Khan Missing case : बहिणीच्या शोधात सना खानचा भाऊ जबलपुरात, खुनाचा संशय

महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक सेलच्या नेत्या सना उर्फ ​​हिना खान जबलपूरमधून बेपत्ता ( Hina Khan missing from Jabalpur ) झाल्या आहेत. सना खान २ ऑगस्टला नागपूरहून जबलपूरला निघाली ( Sana Khan Missing case ) होती. सनाच्या नातेवाईकांनी तिच्या शोध घेण्यासाठी जबलपूर पोलिसांना विनंती केली आहे. जबलपूर येथील एका तरुणाने सनाची हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Sana Khan
Sana Khan

By

Published : Aug 9, 2023, 5:31 PM IST

Updated : Aug 9, 2023, 9:14 PM IST

गणेश तोमर यांची प्रतिक्रिया

जबलपूर :महाराष्ट्रातील भाजप नेत्या सना खानच्या ( Sana Khan Missing case ) शोधात तिचा भाऊ मोहसीन खान जबलपूरला पोहोचला आहे. त्याने पोलिसांना मदतीची विनंती केली असून सनाच्या हत्येचा संशय व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक सेलच्या नेत्या सना उर्फ ​​हिना खान जबलपूरमधून बेपत्ता ( Hina Khan missing from Jabalpur ) झाली आहे. २ ऑगस्टला ती नागपूरहून जबलपूरला निघाली होती. सनाचा भाऊ मोहसीन याने जबलपूरच्या गोरा बाजार पोलिसांकडे आपल्या बहिणीचा शोध घेण्यासाठी अर्ज केला आहे. तसेच सना खानची हत्या पप्पू साहूने केल्याचा आरोप ( Allegation that Sana Khan was killed by Pappu Sahu ) केला आहे.

सना खानच्या हत्येचा संशय

सनाच्या हत्येची भीती :सना नागपूरहून 2 ऑगस्ट रोजी जबलपूरला निघाली होती. त्यादरम्यान तिने जबलपूरला अमित साहूकडे जात असल्याचे सांगितले होते. सनाच्या घरच्यांनी तिला फोन केला असता सनाने फोन उचलला नाही. त्यामुळे सनाच्या घरच्यांनी अमित साहूला फोन केला. तेव्हा अमितने सांगितले की, सनाचे माझे भांडण झाले आहे. त्यामुळे सना घरातून निघून गेली. मात्र, सना नेमकी कुठे गेली याबाबत अमितला काहीत महीत नसल्याचे तो म्हणाला. या घटनेनंतर सनाच्या घरच्यांनी सर्वप्रथम मानकापूर पोलीस ठाण्यात माहिती दिली. महाराष्ट्र पोलिसांनाही जबलपूरमध्ये काहीही सापडले नाही. त्यानंतर तिचे कुटुंबीय तिला शोधण्यासाठी जबलपूरला आले असे मोहसीन खान म्हणाला. ही घटना 4 ऑगस्ट रोजी घडल्याचा देखील मोहसीनने दावा केला आहे. याच दरम्यान मुसळधार पावसामुळे नर्मदा आणि हिरण नद्यांना महापूर आला होता. त्यामुळे अमित आणि पप्पू साहू यांनी सनाची हत्या करून मृतदेह नदीत फेकून दिला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.




बनावट कागदपत्रांच्या आधारे केले लग्न :मोहसीन खानने सांगितले की, सना आणि अमितचे एप्रिल महिन्यात लग्न झाले होते. त्यालाही या लग्नाबाबत जबलपूरला आल्यानंतरच माहिती मिळाली. मात्र, अमित साहूने ज्या प्रमाणपत्राच्या आधारे लग्न केले ती प्रमाणपत्रे बनावट आहेत. त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे कोर्ट मॅरेज केल्याचा आरोप मोहसीन खानने केला आहे.

Last Updated : Aug 9, 2023, 9:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details