महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Congress Leader Anas Pathan Attacked : पत्रकार परिषद सुरू असतानाच काँग्रेसच्या नेत्याचं डोकं फोडलं! हल्ल्याचा आरोप झाल्यानंतर भाजपाकडून पलटवार - नरेंद्र सलुजा

Congress Leader Anas Pathan Attacked : मध्य प्रदेश काँग्रेसचे नेते अनस पठाण यांच्यावर बुधवारी सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला, त्यात ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणावरून सध्या भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आले आहेत.

Congress Leader Anas Pathan Attacked
Congress Leader Anas Pathan Attacked

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2023, 11:49 AM IST

निवडणुकांपुर्वी काँग्रेस नेत्यावर जिवघेणा हल्ला

भोपाळ Congress Leader Anas Pathan Attacked : एकीकडे मध्य प्रदेशात शुक्रवारी 17 नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तर दुसरीकडे राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. बुधवारी संध्याकाळी भोपाळमधून ताजं प्रकरण उघडकीस आलंय. काँग्रेस नेते अनस पठाण यांच्यावर लाठीनं प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी काँग्रेसनं भाजपावर आरोप केले आहेत. राजधानी भोपाळमधील काँग्रेस कार्यालयात पक्षाच्या राष्ट्रीय मीडिया अध्यक्षांच्या पत्रकार परिषदेदरम्यान, सशस्त्र गुंडांनी काँग्रेस नेते अनस पठाण यांच्यावर हल्ला केला. ज्यामुळं ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणानंतर काँग्रेस कार्यालयात एकच गोंधळ उडाला.

अनस पठाण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोर प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात घुसले. त्यानंतर त्यांनी कोणालाही काहीही न बोलता पीसी शर्मा यांचे कट्टर समर्थक आणि काँग्रेस नेते अनस पठाण यांच्यावर लाठ्या-रॉडनं हल्ला केला. या हल्ल्यानंतर अनस यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं तात्काळ काँग्रेस कार्यालयाजवळील रेडक्रॉस रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर परिस्थिती बिघडत असल्याचं पाहून अनस पठाण यांना बन्सल रुग्णालयात रेफर करण्यात आलं. हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही.

काँग्रेस नेत्यावरील हल्ल्यावरून काँग्रेस-भाजप आमनेसामने :या हल्ल्यानंतर आता काँग्रेस नेत्यांनी भाजपवर आरोप केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेते पवन खेडा यांनी हा भारतीय जनता पक्षाचा हल्ला असल्याचं म्हटलंय. ते म्हणाले की, "हा हल्ला भाजपाचा नियोजित कट होता." तर भाजपचं म्हणणं आहे की, हा हल्ला काँग्रेसच्या अंतर्गत वादातून झाला. आपसी भांडणातून झालाय. काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले नरेंद्र सलुजा म्हणाले, "मध्य प्रदेश काँग्रेस कार्यालयात काँग्रेसचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी पवन खेडा यांच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवाले एकमेकांना भिडले. एकाचं डोकं फोडलं. जखमी काँग्रेस नेते भोपाळच्या माजी नगराध्यक्षांचे नाव घेत आहेत. पवन खेडा यांच्यासह काँग्रेसचे समर्थक या हल्ल्यासाठी भाजपाचं खोटं नाव घेत आहेत. यापेक्षा मोठे खोटे काय असू शकते?, असं नरेंद्र सलुजा म्हणाले.

हेही वाचा :

  1. Pravin Darekar : प्रविण दरेकरांची काँग्रेसच्या आंदोलनावर सडकून टीका; म्हणाले, 'गांधी कुटुंबाला...'
  2. Hardik Patel twitter account : गुजरातमध्ये काँग्रेसला बसणार मोठा धक्का...हार्दिक पटेल यांनी पक्ष सोडण्याचे दिले संकेत
  3. महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीनचा वापर नको, भाई जगतापांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details