नवी दिल्ली - रोज पेट्रोलच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य वर्ग मोठा अडचणीत आहे. रोज गाडीचा वापर करून काही दैनंदीन काम करणेही आजच्या काळात अवघड झाले आहे. ही सगळी अशी परिस्थिती असताना मे महिन्याच्या पहिल्याच तारखेला सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. एलपीजी सिलिंडरची किंमत 102.50 रुपयांनी वाढली आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत आहे. (Petrol and Diesel Prices ) आता त्यात एलपीजी गॅस सिलिंडरचीही भर पडली आहे. हे दर कमर्शियल एलपीजी गॅस सिलिंडरचे वाढले आहे. घरगुती सिलिंडरची किंमत तेवढीच आहे. असे असले तरी या महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. कर्मशियल वापरासाठी लागणार्या १९ किलो एलपीजी गॅसची किंमत आधी २ हजार २५३ इतकी होती त्यात १०२.५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे हा सिलिंडर आता २ हजार ३५५.५० रुपयांना मिळणार आहे. तर पाच किलो एलपीजी सिलिंडरची किंमत सध्या ६५५ रुपये इतकी आहे.
सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार -एलपीजी गॅसची किंमत वाढण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी १ अप्रिलला एलपीजी गॅसची किंम्त २५० रुपयांनी वाढली होती. तर १ मार्च रोजी १९ किलो कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत १०५ रुपयांनी वाढली होती. कमर्शियल गॅसचे दर जरी वाढले तरी सर्वसामान्यांना त्याचा फटका बसणार आहे. कारण कमर्शियल गॅसच्या किंमती वाढल्याने हॉटेल, रेस्टॉरेंट आणि इतर ठिकाणचे पदार्थ तसेच वस्तूच्या किंमतीही वाढणार आहेत. ज्या प्रमाणे पेट्रोल डिझेलच्या किंमत वाढल्याने इतर वस्तूंच्या किंमती वाढतात, त्याच प्रमाणे एलपीजी गॅसच्या किंमी वाढल्याने त्याचा प्रभाव इतर वस्तू आणि सेवांच्या दरावरही होणार आहे.