महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

LPG Cylinder Price Hike : एलपीजी सिलेंडर 100 रुपयांनी महागले

नवी दिल्ली : कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 100 रूपयांची वाढ केली आहे. त्यामुळे या सिलेंडरचा दिल्लीतील दर आता 2101 रूपये झाला आहे.

LPG Cylinder Price Hike
एलपीजी सिलेंडर

By

Published : Dec 1, 2021, 12:44 PM IST

Updated : Dec 1, 2021, 1:05 PM IST

नवी दिल्ली : आधिच महागाई मुळे त्रस्त असलेल्या जनतेला आता व्यावसायिक सिलेंडरच्या वाढलेल्या दराचा फटका बसणार आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 1 नोव्हेंबर रोजी 266 रूपयांची घसघसीत वाढ केली गेली होती. त्याच वेळी 19.2 किलो गॅस असलेल्या या सिलेंडरचा दर 2000 पार गेला होता.

रेस्टाॅरंट महागणार
सध्या घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झालेली नसली तरी त्याच्या किंमती 1000 च्या जवळ पोचल्या आहेत. त्व्यवसायिक सिलेंडर चे दर वाढल्यामुळे रेस्टाॅरंट महागण्याची शक्यता आहे. सरकार सिलेंडर वरील सबसिडी बंद करत असल्यामुळे ही दरवाढ होत असल्याच सांगितले जात आहे.

29 कोटी ग्राहक

भारतात सुमारे 29 कोटी ग्राहकांकडे एलपीजी कनेक्शन आहे. त्यातील 8.8 कोटी उज्वला योजनेचे ग्राहक आहेत. घरगुती गॅसची सबसिडी बंद करण्याचे संकेत केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करतानाच दिले होते.

Last Updated : Dec 1, 2021, 1:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details