महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; दोन दिवसांमध्ये ओडिशामध्ये मुसळधार पाऊस - आयएमडी - ओडिशा मुसळधार पाऊस अंदाज

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 45 ते 55 किमी प्रति तास वेगाने वादळ तयार होईल. हे वादळ प्रति तास 65 किमी वेगाने येत्या तीन दिवसांमध्ये ओडीसाच्या किनारी भागात येईल. समुद्राची स्थिती अशांत असेल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

By

Published : Sep 11, 2021, 7:44 PM IST

भुवनेश्वर - येत्या दोन दिवसांमध्ये ओडिशामध्ये मुसळधार पाऊस होईल, असा भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे. कारण, पश्चिम बंगाल उपसागराच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.

पश्चिम बंगाल उपसागराच्या खाडीत शनिवारी सकाळी कमी दाबाचा पट्टा झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा पश्चिम बंगालच्या वायव्य भागातून ओडीसा- पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील किनारी भागात 48 तासांमध्ये पोहोचेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. हा कमी दाबाचा पट्टा ओडिसाच्या पश्चिम-वायव्य भाग आणि छत्तीसगडच्या उत्तर भागामध्ये दोन ते तीन दिवस सरकेल, असे भुवनेश्वर येथील हवामान केंद्राने म्हटले आहे.

हेही वाचा-कोरोनाच्या फटक्यातून देशाची अर्थव्यवस्था सावरली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

मच्छिमारांना सावधानतेचा इशारा-

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 45 ते 55 किमी प्रति तास वेगाने वादळ तयार होईल. हे वादळ प्रति तास 65 किमी वेगाने येत्या तीन दिवसांमध्ये ओडीसाच्या किनारी भागात येईल. समुद्राची स्थिती अशांत असेल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. मच्छिमारांनी समुद्राच्या सखोल भागामधून शनिवारी रात्रीपर्यंत परतावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारपर्यंत समुद्रात जाण्याचे धाडस करू नये, असे आयएमडीने म्हटले आहे.

हेही वाचा-गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा; मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत 'ही' आहेत नावे

या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा इशारा-

ओडीशामधील पुरी, खोरडा, कटक, जगतसिंगपूर, केंद्रपारा, ढेनकानल, जयपूर आणि भद्रक जिल्ह्यात शनिवारी जोरदार ते अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गंजम, बलासोर, नयागढ, अंगुल, बाऊध, संबलपूर, सबर्नपूर, बोलंगीर आणि मयूरभंज या जिल्ह्यामध्ये मुसळधार वृष्टी होईल, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. सोमवारी अंगुल, देवगढ, केओनझर, झारसुगुडा, संबलपूर, सुंदरगढ, बारगढ, बोलंगिर आणि सुबर्णपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार आणि अतिवृष्टी होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा-स्वातंत्र्याची 75 वर्षे : 'जालियनवाला बाग'प्रमाणेच दक्षिणेतही घडले होते क्रूर हत्याकांड.. वाचा, वॅगन हत्याकांड..

ABOUT THE AUTHOR

...view details