महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

धक्कादायक : प्रेमीयुगलाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या - lover couple suicide in dungarpur, Rajasthan

राजस्थानातील धंबोळा ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या युवक आणि युवतीचे खूप दिवसांपासून प्रेमसंबंध होते. परंतु, कुटुंबीयाचा या प्रेमसंबंधाला विरोध होता. घरच्यांच्या नाराजीमुळे दोन्हीही घरापासून काही अंतरावर झाडाला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

lover couple commits suicide by hanging in dungarpur, Rajasthan
धक्कादायक : प्रेमीयुगलाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

By

Published : Sep 27, 2021, 7:45 PM IST

डूंगरपूर (राजस्थान) - जिल्ह्यातील धंबोळा ठाण्याच्या हद्दीतील एका गावामध्ये प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह हे खाली उतरून त्यांना सीमलवाडा येथील रूग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहे.

कुटुंबीयाचा प्रेमसंबंधाला विरोध -

मिळेलेल्या माहितीनुसार, धंबोळा ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या युवक आणि युवतीचे खूप दिवसांपासून प्रेमसंबंध होते. परंतु, कुटुंबीयाचा या प्रेमसंबंधाला विरोध होता. घरच्यांच्या नाराजीमुळे दोन्हीही घरापासून काही अंतरावर झाडाला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

घटनास्थळावरच दोन्ही पक्षाच्या लोकांचा वाद -

रविवारी सकाळी त्या दोहांचेही मृतदेह झाडाला लटकलेले पाहून संपूर्ण गावात खळबळ उडाली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात गावातील लोकांनी घटनास्थळावर गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच धंबोळा ठाण्याचे एसआई रमेश कटारा हे घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावरच दोन्ही पक्षाच्या लोकांचा वाद सुरू झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद मिटवला आणि मृतदेह हे झाडावरून खाली उतरवले. त्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी सीमलवाडा रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा -संयुक्त किसान मोर्चाकडून आज 'भारत बंद', दिल्ली-गुरुग्राम रस्ता जाम

ABOUT THE AUTHOR

...view details