नवी दिल्ली - कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही कोरोनाची लागण झाली आहे. 19 मार्च रोजी त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोना केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. डॉक्टारांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले आहे.
ओम अध्यक्ष हे राजस्थानमधील लोकसभेचे खासदार आहेत. राजस्थानातील कोटा-बूंदी मतदारसंघातून ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले आहेत. संसदेपूर्वी ते राजस्थान विधानसभेवर तीन वेळा निवडून गेले होते.
देशात गेल्या 24 तासात 43 हजार 846 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 197 जणांचा मृत्यू झाला आहे. 22 हजार 956 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 1 कोटी 15 लाख 99 हजार 130 आहे. तर 1 कोटी 11 लाख 30 हजार 288 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 3 लाक 9 हजार 87 जणांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 1 लाख 59 हजार 755 जणांचा मृत्यू झाला आहे.