नवी दिल्ली : सावरकरांविषयी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या विधानावरून रणकंदन माजले असताना दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी सावरकरांविषयी एका भाषणात मांडलेले विचारांचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
सावरकर म्हणजे तेज, त्याग, तप - अटल बिहारी वाजपेयी
एका भाषणादरम्यान बोलताना दिवंगत अटल बिहारी वाजपेयींनी सावरकरांना तप, त्याग, तेज, तर्क, तीर आणि तलवारीची उपमा दिली होती. सावरकर म्हणजे तप, सावरकर म्हणजे त्याग, सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे तर्क, सावरकर म्हणजे तीर आणि सावरकर म्हणजे तलवार असे अटलजी या व्हिडिओत म्हणताना दिसतात.
गांधींच्या सूचनेवरूनच दया याचिका - राजनाथ सिंह
अंदमान तुरुंगात कैद असताना स्वातंत्र्य वीर सावरकर यांनी ब्रिटीशांकडे महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच दया याचिका दाखल केली होती, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन,या उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी राजनाथ सिंह बोलत होते. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये रूपा पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. दरम्यान, यावरून एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भाजवर टीका केली आहे.