रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या फेब्रुवारी महिन्याच्या बँक सुट्ट्यांची यादी पाहिली तर, फेब्रुवारी 2023 मध्ये, विविध राज्यांमध्ये बँका 10 दिवस बंद राहतील. सर्व राज्यांच्या सण आणि नियम वेगवेगळे असल्याने आरबीआई ने त्यानुसार बॅंकेच्या सुट्टयांचे वेळापत्रक ठरवले आहे.
बँका 10 दिवस बंद राहतील : जानेवारी 2023 महिना आज संपणार आहे. उद्या फेब्रुवारी महिना सुरू होणार आहे. हा फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा असणार आहे. फेब्रुवारी महिन्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्यांव्यतिरिक्त महाशिवरात्रीसह अनेक प्रसंगी बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत या सुट्ट्यांची माहिती आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या फेब्रुवारी महिन्याच्या बँक सुट्ट्यांची यादी पाहिल्यास, फेब्रुवारी 2023 मध्ये, विविध राज्यांमध्ये बँका 10 दिवस बंद राहतील. अशा परिस्थितीत या बँकांच्या सुट्ट्यांमध्ये लोकांना ऑनलाइन सेवांद्वारे आपले काम चालवावे लागणार आहे.
सुट्टी तारीख आणि वार :05 फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने देशभरात बॅंका बंद राहतील. 11 फेब्रुवारी रोजी दुसरा शनिवार देशभरातील सरकारी बॅंका बंद राहतील. परत 12 फेब्रुवारी रोजी रविवार आहे, तेव्हा देशभरातील संपूर्ण बॅंकांना सुट्टी असणार. 15 फेब्रुवारी रोजी लुई नगाई नी दिवस असल्याने हैदराबाद, तेलंगणा येथील सरकारी बॅंकांना सुट्टी राहील. 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री हा सण असल्याने बेंगळुरू, हैदराबाद, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, तिरुवनंतपुरम, अहमदाबाद, बेलापूर येथील सरकारी बॅंकांना सुट्टी राहील. तर 19 फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने देशभरात बॅंका बंद राहतील. 20 फेब्रुवारी रोजी राज्य दिवस (स्टेट डे) असल्याने आयझॉल, मिझोरम येथील बॅंकेला सुट्टी राहील. 21 फेब्रुवारी रोजी लोसार सण असल्याने गंगटोक, सिक्कीम येथील बॅंका बंद राहील. 25 फेब्रुवारी रोजी चौथा शनिवार असल्याने देशभरातील बॅंका बंद राहतील. तसेच 26 फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने देशभरातील संपूर्ण बॅंकांना सुट्टी असणार आहे.
मात्र, वरील दिवशी बँक शाखांना सुटी असूनही, तुम्ही ऑनलाइन बँकिंग आणि एटीएमद्वारे पैशांचे व्यवहार किंवा इतर कामे करू शकता. सुट्टीच्या दिवशीही बँकेची ऑनलाइन सेवा सुरू राहणार आहे, याची नोंद घ्यावी.