महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Today Top News : देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर.... - PM Modi leaves for America today

जाणून घ्या आज काय असेल खास, दिवसभर या बातम्यांवर ( Todays Top News ) राहाणार लक्ष. देशात काय घडणार आहे, क्रीडा आणि राजकारण हे विशेष. पहा एका क्लिकवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. ( Important events of the country in one click)

Today Top News
Today Top News

By

Published : Sep 22, 2022, 8:20 AM IST

राजू श्रीवास्तव फ्युनरल : राजू श्रीवास्तव यांच्यावर आज होणार अंतिम संस्कार

Raju Srivastava Funeral : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे. एम्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांनी बुधवारी सकाळी 10.20 वाजता अखेरचा श्वास घेतला. 10 ऑगस्ट रोजी राजू यांना जिममध्ये वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका आला, होता. त्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सर्वत्र शोककळा पसरली असून बॉलीवूड तारकांपासून ते राजकारण्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राजू श्रीवास्तव

पुण्यातील रुपी बँकेला आज लागणार कायमचे टाळे

पुण्यातील रुपी बँकेला आज आपले कामकाज बंद करणार आहे. यानंतर ग्राहक त्यांचे पैसे काढू शकणार नाहीत. देशातील बँकांवर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी कारवाई करत असते. काही बँकांचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत.

Gyanvapi Mosque Case ज्ञानवापी प्रकरणी सुनावणी आज होणार

ज्ञानवापी प्रकरणी न्यायलयानं मोठा निर्णय देत मुस्लीम पक्षकारांचं अपील फेटाळलं असून, हे प्रकरणं सुनावणी योग्य असल्याचं म्हटलं आहे.

उत्तर प्रदेश : ज्ञानवापी प्रकरणी (Gyanvapi Mosque Case) वाराणसी जिल्हा सत्र न्यायालयात (Varanasi Court) आज सुनावणी होणार आहे. न्यायालयाने मुस्लीम पक्षकारांचं याचिका फेटाळली असून हे हिंदू पक्षकारांची भूमिका योग्य असल्याचा निष्कर्ष दिला आहे. या प्रकरणी आता आज सुनावणी घेण्यात येईल.

ज्ञानवापी प्रकरणी सुनावणी

इस्लामाबाद : महिला न्यायाधीशांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी इम्रान खान यांच्याविरोधात आज सुनावणी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी एका महिला न्यायाधीशाविरुद्ध केलेल्या अपमानास्पद टिप्पणीबद्दल "खोल खेद" व्यक्त केला होता. मात्र त्यांनी न्यायालयाच्या अवमानाबद्दल माफी न मागितल्याने त्यांच्या प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे.

इम्रान खान

पंजाब : मुख्यमंत्री भगवंत मान घेणार आज सकाळी ९ वाजता आप आमदारांची बैठक

चंदीगड- पंजाब मंत्रिमंडळाने आज बोलावण्यात येणाऱ्या विधानसभेच्या तिसऱ्या विशेष अधिवेशनाला मंजुरी दिली आहे. यासोबतच पंजाब विधानसभेच्या अध्यक्षांनी विधानसभेच्या अधिवेशनाच्या कामकाजापूर्वी व्हीप जारी केला आहे. यासोबतच आपच्या सर्व आमदारांनाही अधिवेशनात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान विधानसभेच्या अधिवेशनाच्या कामकाजापूर्वी सकाळी ९ वाजता सर्व आमदारांची बैठक घेणार आहेत. सकाळी 11 वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होईल.

मुख्यमंत्री भगवंत मान

संयुक्त राष्ट्र महासभेची बैठक: PM मोदी आज अमेरिकेला रवाना, 24 सप्टेंबरला बायडेन यांची भेट घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पाच दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना होणार आहेत. यादरम्यान ते संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या अधिवेशनात सहभागी होतील तसेच इतर देशांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतील.

दिल्ली-एनसीआरमध्ये मान्सून: आजपासून पावसाची दिल्लीत पावसाची शक्यता,२९ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार

दिल्ली-एनसीआरमध्ये आजपासून पावसाची शक्याता आहे. दिल्लीत हवामान विभागाने बुधवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details