एर्नाकुलम - केरळ उच्च न्यायालयाने आज दोन लेस्बियन्सना एकत्र राहण्याची परवानगी दिली आहे. अलुवा, एर्नाकुलम येथील मूळ रहिवासी असलेल्या आदिला नसरीन यांनी हेबियस कॉर्पस याचिका ( habeas corpus petition Adila Nasrin ) केली होती. फातिमा नुराहला तिच्या कुटुंबाने ( Fathima Noorah Kerala story ) जबरदस्तीने कोंडून ठेवले होते. तिला आदिला नसरीनसोबत जाण्याची उच्च न्यायालयाने परवानगी दिली.
आदिला नसरीन आणि फातिमा नूरह या ( Adila Nasrin and Fathima Noorah ) सौदी अरेबियातील शाळेत एकत्र शिकत असताना प्रेमात पडले. घरच्यांना त्यांच्या नात्याची माहिती मिळाली होती. तेव्हा त्यांनी या संबंधांना विरोध केला. मात्र, केरळला परतल्यानंतरही त्यांनी त्यांचे संबंध सुरूच ठेवले.
नातेवाईकांनी केले नुराचे अपहरण-नोकरी लागल्यावर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. आदिला 19 मे रोजी कोझिकोड येथे नूरहला भेटली. तिला महिला संरक्षण केंद्रात दाखल करण्यात आले. दोघांच्या शोधात कुटुंबीय केंद्रात आले असता पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर आदिलाच्या पालकांनी दोघांनाही त्यांच्या अलुवा येथील निवासस्थानी नेले. मात्र, थामरसेरी येथील नूराचे नातेवाईक अलुवा येथे आले. त्यांनी नूराचे अपहरण केले.