महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sehwag vs Kallis Charity Match : सेहवाग विरुद्ध कॅलिस 'चॅरिटी' सामन्याने लिजेंड्स लीग क्रिकेटला होणार सुरुवात - Sehwag vs Kallis Charity Match

वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag ) शुक्रवारी 'चॅरिटी' सामन्यात इंडियन महाराजा ( Indian Maharaja ) संघाचे नेतृत्व करेल, ज्याचा सामना जॅक कॅलिसच्या नेतृत्वाखालील संघ दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड जायंट्सशी ( World Giants ) होईल.

Virender Sehwag
वीरेंद्र सेहवाग

By

Published : Sep 16, 2022, 5:32 PM IST

कोलकाता:वीरेंद्र सेहवाग आणि 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेल ( Universe boss Chris Gayle ) हे 90 माजी क्रिकेटपटूंमध्ये आहेत जे 'लीजेंड्स लीग क्रिकेट ( LLC )' मध्ये भाग घेणार आहेत. लीजेंड्स लीग क्रिकेट ( Legends League Cricket ) शुक्रवारी ईडन गार्डन्सवर 'चॅरिटी' सामन्याने सुरू होईल. शनिवारी लीगच्या सुरुवातीच्या सामन्यात गौतम गंभीरच्या इंडिया कॅपिटल्स ( India Capitals captain Gautam Gambhir ) विरुद्ध होणाऱ्या गुजरात जायंट्स संघाचे नेतृत्व सेहवाग करेल.

तत्पूर्वी शुक्रवारी मात्र तो दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसच्या नेतृत्वाखालील वर्ल्ड जायंट्स संघाविरुद्धच्या 'चॅरिटी' सामन्यात इंडियन महाराजा संघाचे नेतृत्व करेल ( Virender Sehwag captain of Indian maharaja ). माजी दिग्गज कपिल देव ( Former legend Kapil Dev ) यांची स्वयंसेवी संस्था खुशी फाउंडेशनसाठी ( NGO Khushi Foundation ) पैसे गोळा करणे हा या सामन्याचा उद्देश आहे. खुशी फाउंडेशन मुलींच्या शिक्षणासाठी काम करते.

चार संघांच्या स्पर्धेत हरभजन सिंग मणिपाल टायगर्सचे नेतृत्व करेल ( Harbhajan Singh will lead Manipal Tigers ) तर इरफान पठाण भिलवाडा किंग्जचे नेतृत्व करेल ( Irfan Pathan will lead Bhilwara Kings ). लीगमधील सर्व पंच महिला असतील. या वर्षाच्या सुरुवातीला या स्पर्धेचा पहिला हंगाम मस्कत येथे आयोजित करण्यात आला होता.

हेही वाचा -Mark Boucher Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी मार्क बाउचरची नियुक्ती

ABOUT THE AUTHOR

...view details