बदायूं (उत्तर प्रदेश)Lesbian Marriage: जिल्ह्यातील दातागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत समलैंगिक विवाह (लेस्बियन मॅरेज) केल्याची घटना समोर आलीय. हा परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. वास्तविक, एका मुलीने तिच्या गरोदर मैत्रिणीशीच मंदिरात लग्न केलं आहे. मंदिरात सिंदुर भरताना आणि हार घालतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर झाल्यानं त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. लग्न करून या दोघीही घरी परतल्या आहेत. (lebesian marrige in Badaun)
एकमेकींसोबत राहण्याचं स्वप्न : दातागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन वेगवेगळ्या गावात राहणाऱ्या दोन महिला एका कपड्याच्या दुकानात सेल्स गर्ल्स म्हणून काम करत होत्या. काम करत असताना दोघींमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. यानंतर दोघांनी एकमेकींसोबत राहण्याचं स्वप्नंही बघितलं. काही दिवसांपूर्वी या महिलेनं तिच्या मैत्रिणीला नवरा त्रास देत असल्याचं सांगितलं. हे ऐकताच तिची मैत्रीण तिच्या घरी पोहोचली. यानंतर 26 सप्टेंबर रोजी दोघीही फिरायला जाण्याच्या बहाण्याने घरातून निघून बरेलीला पोहोचल्या. याठिकाणी दोघींनी एका मंदिरात जाऊन एकमेकींसोबत लग्न केलं. याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय.