मुबंई - महाराष्ट्रात सध्या लाऊडस्पीकरचा वाद अद्याप थांबलेला नाही. सध्या राज्यात भोंग्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. राज्य सरकार ने लाऊडस्पीकरबाबत काही नियम जाहीर केले आहेत. ( Raj Thackeray Absent All-Party Meeting ) त्याबाबत आज सोमवार (दि. 25 एप्रिल)रोजी गृमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्व पक्षीय बैठक आयोजीत केली आहे. मात्र, स्वत: राज ठाकरे यांनीच या बैठकीकडे पाठ फिरवली आहे.
राज्यभरच नाही तर देशभर चर्चा - महाराष्ट्राचे नवे वर्ष म्हणजे गुडीपाडवा. त्याच दिवशी म्हणजे शनिवार(2 एप्रिल)रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुंबईत शिवाजी पार्क येथे जाहीर सभा झाली. त्यामध्ये राज ठाकरे यांनी हिंदुत्व या मुद्द्याला हात घातला. त्यावर लक्ष केंद्रीत केले असताना त्यांनी राज्यात मशिदींवर जे भोंगे आहेत त्याचा संपुर्ण राज्यात लोकांना त्याचा त्रास होतो असा मुद्दा उपस्थित करत ते खाली उतरवण्याची सुचना केली. ( All-Party Meeting Convened Thackeray Govt ) जर आपण तसे केले नाही तर मशिदींच्या पुढे मोठ्या आवाजात स्पिकरवर हनुमान चालीसा वाजवली जाईल असा जाहीर इशारा या सभेत त्यांनी दिला. तेव्हाच या वादाला राज्यभरच नाही तर देशभर तोंड फुटले.
सरकार हादरून गेले अशी परिस्थिती - राज ठाकरे यांच्या या सभेनंतर स्वपक्षासह इतर पक्षातील नेत्यांनीही जाहीर बोलायला सुरूवात केली अस संपुर्ण महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले. त्यावर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या सरकारमधील पक्षांनी जोरदार टीका केली. तर, भाजपने जाहीर भूमिका न घेता राज यांना पाठिंबा दर्शवला. दरम्यान, मोठ्या प्रमाणात टीका झाल्याने राज यांनी त्यानंतर (दि. 12 एप्रिल)रोजी ठाण्यात उत्तर सभा घेतली. त्यामध्ये त्यांनी डायरेक्ट अल्टिमेटमच दिला अन् सरकार हादरून गेले अशी परिस्थिती निर्माण झाली.