पणजी ( गोवा ) : लता मंगेशकर यांचे जुने सबंध गोव्याशी आहेत. मंगेशी आणि पर्यायाने मंगेशकर घराण्याची कीर्ती आज संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. या निमित्ताने मंगेशी देवस्थानचे मुख्य पुजारी मंगेश कारंडे यांनी लता मंगेशकर यांच्या आठवणी ( Lata Mangeshkar Mangeshi Temple Goa ) जागवल्या.
Lata Mangeshkar Mangeshi Temple Goa : लता मंगेशकरांचा गोव्याशी आहे खास संबंध.. 'या' मंदिरात वडील करायचे गायन, पुजारी म्हणाले.. - मंगेशी मंदिरात कधीकाळी लता मंगेशकर यांचे वडील गायन करत
भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांचा गोव्याशी खास संबंध होता. गोव्यातील प्रसिद्ध अशा मंगेशी मंदिरात ( Lata Mangeshkar Mangeshi Temple Goa ) कधीकाळी लता मंगेशकर यांचे वडील गायन करत असत. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
लता मंगेशकर
मंगेश देवाचा राहिला सदैव आशीर्वाद
लता मंगेशकर यांचे वडील याच मंगेशी मंदिरात गायन करायचे. 1960- 61 साली मात्र ते मुंबईत स्थायिक झाले. त्यांनतर हळूहळू मंगेशकर घराण्याचा गोव्याशी संपर्क कमी झाला. मात्र त्यांच्यावर सदैव मंगेश देवाचा आशीर्वाद राहिला आहे. 'ए मेरे वतन के लोगो', हे गाणे लता मंगेशकर यांनी गायल्यानंतर नेहरूंनी त्यांना 'गान कोकिळा' ही पदवी बहाल केली. या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.