हैदराबाद -माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची आज 2 ऑक्टोबर जयंती. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म उत्तर प्रदेश राज्यातील मुगलसराय येथे 1904 मध्ये झाला. ते 1920 मध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहिली. त्याचसोबत 1921 चे असहकार आंदोलन, 1930 ची दांडी यांत्रा आणि 1942 मध्ये सुरु करण्यात आलेले भारत छोडो आंदोलन यात त्यांची विशेष सहभाग राहिला आहे. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान पंडित जवारहलाल नेहरु यांच्या निधनानंतर देशाचे दुसरे पंतप्रधान झाले. पंतप्रधान असताना त्यांनी 'जय जवान, जय किसान' हा नारा दिला.
2 ऑक्टोबर रोजी भारतातील दोन महान नेत्यांचा जन्मदिवस असतो. याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचीही जयंती असते तर देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचा जन्मदिवसही याच दिवशी असतो.
लाल बहादुर शास्त्रींचा जीवन परिचय -
लाल बहादुर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तरप्रदेश राज्यातील मुगलसराय येथे झाला होता. त्यांनी काशी विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. 1928 मध्ये त्यांचा विवाह ललिता यांच्याशी झाला. त्यांना एकूण सहा मुले झाली. त्यामध्ये दोन मुली कुसुम आणि सुमन व चार मुले हरिकृष्ण, अनिल, सुनील व अशोक आहेत.
शास्त्रीजी नऊ वेळा गेले आहेत तरुंगात -
स्वतंत्र्य संग्रामात लाल बहादुर शास्त्री अनेक वेळा तुरुंगात गेले होते. 1930 मध्ये मीठ सत्याग्रहात त्यांना अडीच वर्षे तरुंगवास झाला होता. त्यानंतर त्यांना 1942 च्या भारत छोड़ो आंदोलनादरम्यान चार वर्षे तुरुंगवास झाला. जीवनात त्यांना एकूण 9 वेळा तुरुंगवारी करावी लागली.
पंडित नेहरूनंतर पंतप्रधान पदाची माळ पडली शास्त्रीजींच्या गळ्यात -
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरू यांच्या निधनानंतर लाल बहादुर शास्त्री देशाचे दूसरे पीएम बनले. त्यांनी देशवासीयांना जय जवान जय किसान असा नारा दिला. पंडित नेहरू यांच्यानंतर पंतप्रधान पदासासाठी लाल बहादुर शास्त्री आणि मोरारजी देसाई यांची नावे सर्वात पुढे होती. मात्र पंतप्रधान पदाची माळ शास्त्रीजींच्या गळ्यात पडली व त्यांनी ही जबाबदारी खूपच चांगल्या पद्धतीने निभावली. 9 जून 1964 रोजी लाल बहादुर शास्त्री यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
पंतप्रधान बनल्यानंतर अनेक आव्हानांचा सामना -
जेव्हा शास्त्री पंतप्रधान बनले तेव्हा देशात अन्नधान्याची कमी एक मोठे आव्हान होते. त्यावेळी अन्नधान्यासाठी भारत अमेरिकेवर अवलंबून होता. त्यांनी आपल्या पहिल्याच संबोधनात देशात खाद्यान्न मुल्यांची वृद्धी रोखण्याला प्राधान्य असल्याचे सांगितले. त्याचवेळी 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला केला होता.
जय जवान, जय किसान चा नारा -
पाकिस्तानशी सुरू असलेल्या युद्धावेळी देशात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. त्याचवेळी देशाला आत्मविश्वास देण्यासाठी शास्त्रींनी 'जय जवान, जय किसान ' चा नारा दिला होता. अन्नाच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या देशाला रुळावर आणण्यासाठी त्यांनी देशवासीयांना आवाहन केले की, एक वेळचे जेवण त्याग करा, हे आवाहन जनतेने खुशी-खुशी स्वीकारले.
ताश्कंद करारानंतर अचानक मृत्यू -