महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महंत गिरींनी आपली समाधी लिंबाच्या झाडाखाली बांधण्याची इच्छा का व्यक्त केली?, पहा ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट

ज्या महंताने आपली समाधी लिंबाच्या झाडाखाली बांधण्यीची इच्छा व्यक्त केली आहे, त्याचा अर्थ असा, की त्यांच्यामागे अनेक षडयंत्रकार होते. ते आपल्याला त्रास देत होते. या सर्वांचा नाश होण्यासाठी लिंबाच्या झाडाखाली समाधी बांधली जाते, अशी माहिती मौनी बाबांनी दिली आहे. ते महंत नरेंद्र गिरी यांच्या अंत्यविधीसाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते.

महंत नरेंद्र गिरींनी आपली समाधी लिंबाच्या झाडाखाली बांधण्याची इच्छा का व्यक्त केली?
महंत नरेंद्र गिरींनी आपली समाधी लिंबाच्या झाडाखाली बांधण्याची इच्छा का व्यक्त केली?

By

Published : Sep 23, 2021, 9:11 AM IST

प्रयागराज (उत्तर प्रदेश) - ज्या महंताने आपली समाधी लिंबाच्या झाडाखाली बांधली पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली आहे, त्याचा अर्थ असा की त्यांच्यामागे अनेक षडयंत्रकार होते. ते आपल्याला त्रास देत होते. या सर्वांचा आपली समाधी लिंबाच्या झाडाखाली बांधली तर नाश होतो. त्यामुळे समाधी लिंबाच्या झाडाखाली बांधली जाते, अशी माहिती अमेठीतील महंत मौनी बाबांनी दिली आहे. ते महंत नरेंद्र गिरी यांच्या अंत्यविधीसाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, महंत नरेंद्र गिरी यांनी आपली समाधी लिंबाच्या झाडाखाली व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

महंत मौनी बाबा माहिती देताना

'शत्रूचा नाश करण्यासाठी लिंबाच्या झाडाखाली बांधली समाधी'

ज्या शत्रूंमुळे महंत नरेंद्र गिरी यांचा मृत्यू झाला त्यांचा लिंबाच्या झाडाखाली समाधी बांधल्यामुळे लाश होईल. तसेच, जे भक्त येथे दर्शनाला येतील त्यांच्या शत्रूचाही नाश होईल, असही मौनी बाबा यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, या ठिकाणी 10×10 आणि 12×12 फूटाची समाधी बनवली आहे. सर्व तीन चौरस फूट जागा तयार केली गेली आहे. या ठिकाणी शरीर पद्मासन किंवा सिद्धसन स्थितीत ठेवण्यात येते. त्यावर शिवलिंग आणि त्याची मूर्तीही बसवण्यात येईल असही त्यांनी सांगितले.

'एका साधूची अंत्ययात्रा ही तीर्थयात्रा आहे'

समाधी संन्यासींची बांधली जाते. जे सन्यास घेतल्यानंतर त्यांचे पिंड दान करतात. त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर जाळले जात नाही. एकतर भू-समाधी दिली जाते किंवा तेथे जल समाधीची प्रक्रिया असते. एका खड्ड्यात संपूर्ण पुजा केली जाते आणि त्यानंतर समाधी दिली जाते. त्यानंतर भक्त त्याची मूर्तीप्रमाणे पूजा करतात. दरम्यान, ही परंपरा अनादी काळापासून चालू आहे. असे म्हणतात, की एका साधूची अंत्ययात्रा ही तीर्थयात्रा आहे. एका वर्षात याला पूर्णपणे समाधीचे रुप प्राप्त होते, असही मौनी बाबा यावेळी म्हणाले आहेत.

संत आणि त्यांचे शिष्य मोठ्या संख्येने महंत गिरी यांना निरोप देण्यासाठी उपस्थित

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचे पार्थिव शवविच्छेदनानंतर बाघंब्री मठात आणण्यात आले होते. या ठिकाणी येथील तेरा आखाड्यांनी परंपरेप्रमाणे पूजा केली. त्यानंतर गिरी यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यामध्ये येथील महंत आणि त्यांचे शिष्य मोठ्या संख्येने महंत गिरी यांना निरोप देण्यासाठी सहभागी झाले होते.

'महंत नरेंद्र गिरी यांनी अनेक वर्षे झोपलेल्या हनुमानाची सेवा केली'

शवविच्छेदनानंतर नरेंद्र गिरी यांचा मृतदेह बाघंब्री गड्डी येथे नेला. मृतदेह तिथे पोहचताच तेथे उपस्थित महंत आणि भक्तांना अश्रू अनावर झाले. महंतांना अखेरचा निरोप देताना सर्व जनसमूदाय मोठ्या शोकाकूल अवस्थेत असलेला पाहायला मिळाला. दरम्यान, ही अंत्ययात्रा पुढे संगमसाठी गेली. त्यानंतर त्यांना झोपलेल्या हनुमान मंदिरात नेण्यात आले. या ठिकाणी महंत नरेंद्र गिरी यांनी अनेक वर्षे झोपलेल्या हनुमानाची सेवा केली होती.

'15 कामगार सतत थडग्याच्या सजावटीमध्ये गुंतलेले'

दरम्यान, महंत गिरी यांची कलकत्ता, वाराणसी आणि प्रयागराज येथून आणलेल्या फुलांनी समाधी सजवली गेली. थडग्याची सजावट करणाऱ्या कंत्राटदाराने सांगितले की आजपर्यंत प्रयागराजमध्ये अशा प्रकारे कोणत्याही समाधी स्थानाची सजावट केलेली नाही. मंगळवारपासून सजावट सुरू आहे. 15 कामगार सतत थडग्याच्या सजावटीमध्ये गुंतलेले होते.

हेही वाचा -महंत नरेंद्र गिरींचा गुदमरून मृत्यू; शवविच्छेदन अहवालात समोर

ABOUT THE AUTHOR

...view details