मुंबई :गेल्या काही दिवसापासून कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आज इंधन कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. इंधन दरवाढीमुळे सामान्यांचे बजेट आणखी बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कच्चा तेलाच्या दरात होत असलेल्या घसरणीचा फायदा अजूनही ग्राहकांना मिळाला नाही. कच्च्या तेलाच्या दरात 30 जानेवारीला वाढ झाली, असून प्रति बॅरल 88 डॉलरवर दिसून येत होता. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 87.35 डॉलरवर आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल 80.37 डॉलर आहे.
भारतात पट्रोल-डिझेलचे दर : देशातील तेल विपणन कंपन्यांनी 2022 एप्रिलमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अखेरचा बदल केला होता. तर त्यानंतर मे महिन्यात केंद्र सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली होची. केंद्राचे अनुसरण करत राज्य सरकारांनी देखील व्हॅट कपात जाहीर केली, मात्र, तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारने जुलै महिन्यात इंधनावर कर कपात जाहीर केली होती. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात येतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होत असते. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले पाहावयास मिळत आहे.