महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Punjab Assembly election 2022 Results : आपला 117 पैकी 89 जागांवर विजय; स्पष्ट बहुमत मिळाल्याने भगवंत मान मुख्यमंत्री होण्याच्या मार्गावर...

पंजाब विधानसभा निवडणूक
पंजाब विधानसभा निवडणूक

By

Published : Mar 10, 2022, 6:33 AM IST

Updated : Mar 16, 2022, 9:15 AM IST

18:26 March 10

आपला 117 पैकी 89 जागांवर विजय; स्पष्ट बहुमत मिळाल्याने भगवंत मान मुख्यमंत्री होण्याच्या मार्गावर...

निवडणूक आयोगाकडील सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार आपने पंजाबमध्ये 89 जागांवर विजय मिळविला आहे. तर काँग्रेसला 15 जागांवर विजय मिळाला आहे. शिरोमणी अकाली दल-बसपा युतीला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. तर भाजपला 2 जागंवर विजय मिळाला आहे. भगंवत मान हे आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत.

17:16 March 10

काँग्रेसने अमरिंदर सिंग यांच्यावर फोडले अपयशाचे खापर!

पंजाबमध्ये आपने बहुमत मिळविले आहे. तर काँग्रेसचा सपाटून पराभव झाला आहे. त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग अहुवालियाने प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने चरणजीत सिंग चन्नी या भूमीपुत्राच्या रुपाने नवे नेतृत्व सादर केले. मात्र, कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या 4.5 वर्षातील सरकारविरोधातील लाटेमुळे लोकांनी आपला मतदान केल्याचा अहुवालिया यांनी म्हटले आहे.

15:46 March 10

आपची 92 जागांवर आघाडी, काँग्रेसला केवळ 18 जागांवर आघाडी

आप 92 मतावर आघाडीवर, काँग्रेस 19 जागांवर, शिरोमणी अकाली दल 4 जागांवर, भाजप 2 तर इतर एका जागेवर आघाडीवर आहेत.

PUNJAB (117/117)
INCAAPSAD+BJP+OTH
1892421

15:36 March 10

पंजाबच्या लोकांमध्ये भाजप विरोधात संताप होता - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

पंजाबच्या लोकांमध्ये भाजप विरोधात संताप होता. त्यामुळे आम आदमी पक्षाला लोकांनी बहुमत दिल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे अधिक प्रमाण असताना लोकांमध्ये मोदी सरकारबद्दल जनेत संताप होता. भाजपला महाराष्ट्रात अडीच वर्षे वाट पाहावी लागणार असल्याचा टोलाही शरद पवार यांनी लगाविला आहे.

15:32 March 10

पंजाबच्या लोकांनो, तुम्ही कमाल करून दाखविली - अरविंद केजरीवाल

आपचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या जनेतेचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले, की पंजाबच्या लोकांना, तुम्ही कमाल केली. तुमचे निकालाचे परिणाम खूप इन्कलाब आहेत. आम्ही पंजाबवर प्रेम करतो. सुखबीर सिंग बादल, कॅप्टन सिंग बादल, चन्नी सिंग, प्रकाश सिंग बादल, नवज्योत सिंग सिद्धू, विक्रम सिंग मजिठिा हे पराभूत झाले आहेत. पंजाबच्या लोकांनी खूप विलक्षण कामगिरी केल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

15:00 March 10

मुख्यमंत्र्यांनतर उपमुख्यमंत्री नवज्योत सिंग सिद्धूसह प्रकाशसिंग बादल यांचा पराभव

पूर्व अमृतसरमध्ये उपमुख्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल यांचा पराभव झाला आहे. दोन्ही नेते आपच्या उमेदवारांकडून पराभतू झाले आहेत.

14:49 March 10

काँग्रेसला मोठा धक्का; चरणजीत सिंग यांचा भदौड मतदार संघामधून पराभव

आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी मोठी घोषणा केली आहे. राजभवनात नाही, तर भगतसिंग यांच्या खाटकारकालन गावाात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांचा भदौड मतदारसंघामध्ये पराभव झाला आहे.

14:08 March 10

भगवंत मान यांनी समर्थक व पक्ष कार्यकर्त्यांचे मानले आभार, प्रस्थापितांना लावला टोला

मोठे साहेब ( सुखबीर सिंग बादल ) हे जलालाबादमधून हरले आहेत. कॅप्ट पतियालामधून हरले आहेत. सिद्धू आणि मजिठिया यांचाही पराभव होत आहे. चन्नी यांचा दोन्ही जागांवर पराभव होत असल्याचा दावा आपचे नेते भगवंत यांनी केला. आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी पक्ष कार्यकर्ते व समर्थकांचे संगरूर येथे आभार मानले आहेत. मान यांचा 55 हजार मतांनी विजय झाला आहे.

13:40 March 10

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पराभवानंतर प्रतिक्रिया दिली, म्हणाले...

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पराभवानंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले, की मी जनतेने दिलेला निकाल नम्रपणे स्वीकारत आहे. पंजाबच्या लोकांनी जात आणि पंथापलीकडे जाऊन मतदान केले आहे. त्यांनी पंजाबीपणा दाखविल्याचे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.

13:12 March 10

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांची दोन्ही जागांवर मोठी पिछेहाट, आपची 92 जागांवर आघाडी

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा भदौरमध्ये 22,843 मतांनी पिछेहाट आहे. तर चमकौर साहिबमध्ये 2671 मतांनी पिछेहाट असल्याचे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून चित्र दिसत आहे.

दुपारी 1 वाजून 10 मिनिटांचे अपडेट

PUNJAB (117/117)
INCAAPSAD+BJP+OTH
1792521

13:01 March 10

अरविंद केजरीवाल यांनी जनतेचे आभार मानणारे केले ट्विट; भगवंत मान यांचा विजय

पंजाबमध्ये आपची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबद्दल आपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत पंजाबच्या जनतेचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विटमध्ये आपचे नेते व मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांचा फोटो ट्विट केला आहे. यामध्ये दोघेही नेते विजयाची खूण करताना दिसत आहे. भगवंत मान यांचा विजय झाला आहे.

12:48 March 10

शिरोमणी दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर पराभवाची पडछाया

शिरोमणी दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांची जलालाबादमध्ये मोठी पिछेहाट होत आहे. त्यांची 10,5226 मतांनी पिछेहाट आहे. दुसरीकडे लांबीमधूनही प्रकाश सिंग बादल यांची मोठी पिछेहाट होत आहे.

12:40 March 10

नवज्योत सिंग सिद्धूने आपचे केले अभिनंदन

आपने पंजाबमध्ये मुसंडी मारली असताना पंजाब काँग्रेसने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. लोकांचा आवाज हा ईश्वराचा आवाज असतो. नम्रपणे पंजाबच्या लोकांनी दिलेला कौल स्वीकारत आहे. अभिनंदन आप, असे ट्विट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी केले आहे.

12:26 March 10

अमरिंदर सिंग यांचा पराभव, आपचे अजितपाल सिंग कोहली विजयी

अमरिंदर सिंग यांचा पराभव झाला आहे. आपचे अजितपाल सिंग कोहली विजयी झाले आहेत.

11:49 March 10

पंजाबमधून दोन उमेदवारांचे निकाल हाती, कपुरथाळामधून काँग्रेसचे राणा गुरजीत सिंग तर पठाणकोटमधून अश्विनी कुमार यांचा विजय

अश्विनी कुमार

पंजाबमधून दोन उमेदवारांचे निवडणूक निकाल हाती आले आहेत. पठाणकोटमधून अश्विनी कुमार यांचा विजय झाला आहे.

11:49 March 10

राणा गुरजीत सिंग

पंजाबमधून दोन उमेदवारांचे निवडणूक निकाल हाती आले आहेत. कपुरथाळामधून काँग्रेसचे राणा गुरजीत यांचा विजय झाला आहे.

11:43 March 10

लांबी मतदारसंघामधून प्रकाश सिंग बादल यांची 5 हजार मतांनी पिछेहाट, आपचे उमेदवार आघाडीवर

पंजामध्ये प्रस्थापित नेत्यांवर पराभवाची छाया आहे. शिरोमणी अकाली दलाचे प्रकाश सिंग बादल यांची लांबी मतदारसंघामध्ये 5 हजारांनी पिछेहाट आहे. आपचे उमेदवार गुरमीत सिंग खुदियान हे आघाडीवर आहेत. 90 वर्षांचे प्रकाशसिंग हे देशातील सर्वाधिक वयाचे विधानसभा निवडणुकीतील उमेदवार आहेत.

10:53 March 10

117 पैकी आपची 89 जागांवर आघाडी, 12 जागांवर काँग्रेसची आघाडी, भाजपची 5 जागांवर आघाडी

पंजाब विधानसभा मतमोजणीत आपने 117 पैकी आपची 89 जागांवर आघाडी घेतली आहे. तर 12 जागांवर काँग्रेसची आघाडी, भाजपची 5 जागांवर आघाडी आहे.

10:32 March 10

काँग्रेसला धक्का; मुख्यमंत्री चन्नी यांची दोन्ही जागांवर पिछेहाट, नवज्योत सिंग यांची पूर्व अमृतसरमध्ये पिछेहाट

पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसत आहे. दोन जागांवर निवडणूक लढविणारे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांची दोन्ही ठिकाणी पिछेहाट होत आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंग हे भदौर आणि चरमकौर साहिबमधून निवडणूक लढवित आहे. तर नवज्योत सिंग सिद्धू यांची पूर्व अमृतसरमधून पिछेहाट होत आहे. काँग्रेसमध्ये दोन्ही बड्या नेत्यांची पिछेहाट होत असताना काँग्रेस केवळ 10 जागांवर आघाडी आहे. तर 89 जागांवर आपची आघाडी आहे.

पंजाब ( मतमोजणीतील आघाडी )
काँग्रेसआपशिरोमणी दलभाजप आणि इतरइतर
11901150

10:23 March 10

आप ही काँग्रेसची जागा घेणार - राघव चढ्ढा

आपचे नेते व पंजाबसाठीचे समन्वयक राघव चढ्ढा म्हणाले, की पहिल्या दिवशीपासून पंजाबमध्ये आपची सत्ता येणार असल्याचे सांगत आहे. भविष्यात अरविंद केजरीवाल हे भाजपचे प्रमुख विरोधक असणार आहेत. तर आपही काँग्रेसची जागा घेणार आहे.

10:18 March 10

पंजाबमध्ये 82 जागांवर आपची आघाडी; पहिल्यांदाच आपची सत्ता येण्याची शक्यता

काँग्रेस 15 जागांवर, आप 82 जागांवर, शिरोमणी अकाली दल 14 जागांवर, तर भाजप 5 जागांवर तर इतर एका जागेवर आघाडीवर आहे. बहुमतासाठी 59 जागांची गरज आहे. अशा परिस्थितीत आपची पहिल्यांदाच पंजाबमध्ये सत्ता येण्याची चिन्हे आहेत.

10:14 March 10

आपमध्ये उत्साह; भगवंत मान यांच्या घरी जल्लोष सुरू

दिल्लीचे मंत्री आणि आपचे उमदेवर गोपाल राय म्हणाले, की आम्ही भाजपमध्ये सकारात्मक बदल पाहत आहोत. हे निकाल सकारात्मक होणार असल्याची आशा आहे. पंजाबच्या लोकांनी बदलासाठी मतदान केले आहे. पंजाबने 88 हून अधिक जागांवर आघाडी घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

आपचे उमेदवार भगवंत मान यांच्या संगरुर येथील घरी कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. धुरी या मतदारसंघामध्ये आघाडीवर आहेत.

10:14 March 10

10:02 March 10

चमकौरमधून मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचे पिछेहाट; आपचे डॉ. चरणजीत सिंग हे आघाडीवर

चमकौरमधून मुख्यमंत्री व काँग्रेसचे उमेदवार चरणजीत सिंग चन्नी यांचे पिछेहाट होत आहे. तर आपचे डॉ. चरणजीत सिंग हे आघाडीवर आहेत.

09:52 March 10

माजी मुख्यमंत्री प्रकाशिंग बादल यांची लांबा मतदारसंघामध्ये पिछेहाट

लांबा विधानसभेची निवडणूक चर्चेत आहे. कारण, शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पाचवेळा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पाडलेले प्रकाशसिंग बादल यांची पिछेहाट होत आहे. बादल हे देशातील सर्वात जुन्या नेत्यांपैकी एक आहेत. काँग्रेसने जगपाल सिंग यांना तर आम आदमी पार्टीने गुरमीत खुडिया यांना बादल यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. लांबा विधानसभेच्या जागेवर विविध पक्षांचे एकूण 7 उमेदवार रिंगणात आहेत.

09:40 March 10

पूर्व अमृतसरमध्ये अटीतटीची लढत; आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान आघाडीवर

पूर्व अमृतसरमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांची पिछेहाट सुरू आहे. आता सुरू असलेल्या मतदानामध्ये आम आदमी पार्टीचे उमेदवार जीवनजोत - 5005 काँग्रेस उमेदवार नवज्योत सिंग सिद्धू - 3551 शिरोमणी अकाली दलाचे उमेदवार मंजिठिया - 4048 भारतीय जनता पक्षाचे उमेदवार - 435 अशी मते मिळाली आहे. आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान आघाडीवर आहेत.

09:33 March 10

97 जागापैकी 54 जागांवर आपची आघाडी, दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसची 18 जागांवर आघाडी

पंजाब विधानसभेच्या मतमोजणीमध्ये 54 जागांवर आपची आघाडी, दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसची 18 जागांवर आघाडी आहे. तर शिरोमणी अकाल तिसऱ्या क्रमांकावर असून 16 जागांवर आहे. तर भाजप 2 तर इतर एका जागेवर आघाडी आहेत. विधानसभेत बहुमतासाठी 59 जागांची गरज आहे.

09:31 March 10

97 जागापैकी 54 जागांवर आपची आघाडी, दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसची 18 जागांवर आघाडी

पंजाब विधानसभेच्या मतमोजणीमध्ये 54 जागांवर आपची आघाडी, दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसची 18 जागांवर आघाडी आहे. तर शिरोमणी अकाल तिसऱ्या क्रमांकावर असून 16 जागांवर आहे. तर भाजप 2 तर इतर एका जागेवर आघाडी आहेत.

09:22 March 10

आपचे उमेदवार जीवनज्योत सिंग पूर्व अमृतसरमधून आघाडीवर, नवज्योत सिंग यांची पिछेहाट

आपचे उमेदवार जीवनज्योत सिंग पूर्व अमृतसरमधून आघाडीवर, नवज्योत सिंग यांची पिछेहाट झाली आहे. मोगा मतदारसंघात सोनू सूडची बहिण मालविका सूड यांची पिछेहाट झाली आहे.

09:11 March 10

117 जागांपैकी 13 जागांवर काँग्रेस, आपची 22 जागांवर आघाडी

117 जागांपैकी 13 जागांवर काँग्रेस, आपची 22 जागांवर आघाडी आहे. तर शिरोमणी अकाली दल 13 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 3 जागांवर आघाडीवर आहे. बसपा, पंजाब लोक काँग्रेस, संयुक्त शिरोमणी अकाली दल एकाही जागेवर आघाडीवर नाही.

09:05 March 10

काँग्रेसची 15 जागांवर, आप 18 जागांवरआघाडीवर

काँग्रेसची 15 जागांवर, आप 18 जागांवर तर शिरोमणी अकाली दल 11 जागांवर आघाडी आहे. तर भाजप 2 जागांवर आघाडी आहे. तर इतर पक्ष व उमेदवार 1 जागावर आघाडीवर आहेत.

08:54 March 10

पतियालामधून माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची पिछेहाट; काँग्रेसची 16 जागांवर आघाडी

काँग्रेस 16 जागांवर, आप 14 जागांवर तर शिरोमणी दलाने 11 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपचे 2 जागांवर आघाडी आहे. तर इतर पक्षांची 1 जागांवर आघाडी आहे.

08:49 March 10

मतमोजणीत 11 हून अधिक जागांवर काँग्रेसने घेतली आघाडी; मुख्यमंत्री सहकुटुंब गुरुद्वारात घेतले दर्शन

विधानसभा निवडणुकीच्या 11 हून अधिक जागांवर काँग्रेसने आघाडीवर घेतली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी चामकौर साहिब गुरुद्वारात सहकुटुंब दर्शन घेतले आहे.

08:46 March 10

पूर्व अमृतसरमधून नवज्योत सिंग सिद्धू, चामकौर साहिबमधून चरणजीत सिंग आघाडीवर, पठाणकोटमध्ये भाजपचे अश्विनी कुमार आघाडीवर

सेंट्रल अमृतसरमध्ये काँग्रेसचे ओम प्रकाश सोनी, पूर्व अमृतसरमधून नवज्योत सिंग सिद्धू, नॉर्थ अमृतसर मधून शिरोमणी अकाली दलाचे अनिल जोशी, वेस्ट अमृतसरमधून काँग्रेसचे राजकुमार वेरका, आनंदपूर साहिबमधून आपचे हरजोत सिंग बैन्स आघाडीवर आहेत. बाबा बाकलामधून काँग्रेसचे संतोख सिंग, चामकौर साहिबमधून चरणजीत सिंग आघाडीवर आहेत. पठाणकोटमध्ये भाजपचे अश्विनी कुमार आघाडीवर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पठाणकोटमध्ये सभा घेतली होती.

08:37 March 10

पंजाब विधानसभा 2022 निकाल : काँग्रेस 6 जागांवर तर आपची 5 जागांवर आघाडी

काँग्रेस 6 जागांवर आघाडी, आपची 5 जागांवर आघाडी आहे. तर शिरोमणी अकाली दल 2 जागांवर तर भाजप 1 जागेवर आघाडी आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काँग्रेस आणि आपची आघाडीवर येण्यासाठी टक्कर सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

08:33 March 10

117 जागापैकी 6 जागांवरील कल हाती; 3 जागांवर काँग्रेस, 3 जागांवर आप तर एका जागेव अकाली दल आघाडीवर

काँग्रेसची 5 जागांवर आघाडी, आपची 4 जागांवर आघाडी, शिरोमणी अकाली दल 2 जणांवर आघाडी आहे. तर भाजपने आघाडीवर राहण्यात खाते खोलले आहे.

08:29 March 10

गुरुदासपूर येथील मतदान केंद्रावर पोस्टल मतमोजणी सुरू आहे.

गुरुदासपूर येथील मतदान केंद्रावर पोस्टल मतमोजणी सुरू आहे.

08:26 March 10

मतमोजणीत 3 जागांवर काँग्रेस, 3 जागांवर आप तर एका जागेवर अकाली दल आघाडीवर

117 जागापैकी 6 जागांवरील कल दिसत आहे. मतमोजणीत 3 जागांवर काँग्रेस, 3 जागांवर आप तर एका जागेवर अकाली दल आघाडीवर आहे.

08:23 March 10

गुरदासपूर आणि मोहाली येथे मतमोजणी सुरू; पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

गुरदासपूर आणि मोहाली येथे मतमोजणी सुरू झाली आहे. गुरुदासपूर जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात आणि मोहालीमध्ये मतमोजणी सुरू झाली आहे. बर्नाला येथे लवकरच मतमोजणी सुरू होणार आहे. बर्नाला येथील मतमोजणीला लवकरच सुरुवात होणार आहे. यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांचे नेत्यांनी विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. सध्या पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

07:34 March 10

पंजाबमध्ये मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरू

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याची तयारी सुरू आहे. अमृतसरमध्ये मतमोजणी केंद्रावर पोस्टल मतदानाच्या पेट्या नेल्या जात आहेत.

07:26 March 10

पंजाबमधील लोकांनी बदल घडविण्यासाठी मतदान केल्याची आशा- भगवंत मान

पंजाबमधील लोकांनी बदल घडविण्यासाठी मतदान केल्याची आशा- भगवंत मान

आपचे नेते भगवंत मान यांनी संगरुर येथील गुरुसागर मस्तुआना साहिब गुरुद्वारात दर्शन घेतले. पंजाबमधील लोकांनी बदल घडविण्यासाठी मतदान केले असेल, अशी आम्हाला आशा आहे, असे भगवंत यांनी म्हटले आहे.

07:08 March 10

अमृतरसमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त; निवडणूक निकाल घरीच पाहण्याचे पोलिसांचे आवाहन

अमृतसर - पंजाब विधानसभा निवडणूक 2022 (पंजाब विधानसभा निवडणूक 2022) निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अमृतसर येथे पोलिसांनी रात्री उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यामुळे निकालापूर्वी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी रात्रीची गस्त वाढवली. दरम्यान, जनतेने पोलीस प्रशासनाला साथ द्यावी आणि घरबसल्या निवडणुकीचा निकाल पाहावा, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले.

06:53 March 10

निकालापूर्वीच आपचे भगवंत मान यांच्याकडून जल्लोषाची तयारी सुरू

आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्या संगरुर येथील निवासस्थानी जिलेबी बनविली जात आहे. फुलांनी सजावट केली जात आहे.

06:37 March 10

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीच सिंह चन्नी यांनी गुरुद्वारात श्री कतलगड साहिबांचे घेतले दर्शन

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीच सिंह चन्नी यांनी रोपड गुरुद्वार श्री कतलगड साहिब येथे दर्शन घेतले. पंजाब विधानसभा निवडणुकीचे आज निकाल लागणार आहेत. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी भदौर आणि चमकौर साहिब मतदारसंघातून निवडणूक ( Punjab CM Charansingh Channi ) लढवत आहेत/

06:25 March 10

पंजाब विधानसभा 2022 निकाल : आपला 117 पैकी 89 जागांवर विजय; स्पष्ट बहुमत मिळाल्याने भगवंत मान मुख्यमंत्री होण्याच्या मार्गावर...

नवी दिल्ली - पंजाबमध्ये सरकार कोणाचे येणार? जुन्या परंपरेनुसार सरकार बदलेल की काँग्रेसची जादू चालेल ( Punjab election result ) याबाबत औत्सुक्य आहे. आम आदमी पक्ष सत्तेच्या जवळ येईल की त्रिशंकू विधानसभा सत्तेची नवी राजकीय समीकरणे तयार करेल? पंजाबमध्ये ही सर्व राजकीय समीकरणे ( Punjab election result date ) आज ठरणार आहेत.

117 जागांवर 1304 उमेदवारांचे राजकीय भवितव्य

पंजाबमधील 117 जागांवर 1304 उमेदवारांचे राजकीय भवितव्य पणाला ( Punjab candidates in assembly election ) लागले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी भदौर आणि चमकौर साहिब मतदारसंघातून निवडणूक ( Punjab CM Charansingh Channi ) लढवत आहेत. याशिवाय आपचे सीएम उमेदवार भगवंत मान, काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू, अकाली दलाचे नेते प्रकाश सिंग बादल, सुखबीर बादल यांच्या भवितव्याचाही गुरुवारी निर्णय होणार आहे. यावेळी अकाली दलाने बसपासोबत युती केली आहे. पंजाबमधील 117 जागांपैकी 97 जागा अकाली आणि 20 जागा बसपाने जिंकल्या आहेत. कॅप्टन अमरिंदर यांच्या पक्षाव्यतिरिक्त भाजपने अकाली दलाबरोबर युती केली आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकीची लढत यावेळी खूपच रंजक असणार आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्थापन केलेला नवीन पंजाब लोक काँग्रेस पक्षही यावेळी आम आदमी पक्षासोबत निवडणूक लढवण्यासाठी रिंगणात आहे. अकाली दल पहिल्यांदाच भाजपपासून वेगळे निवडणूक लढवत आहे. यावेळी अशा पाच जागा आहेत जिथे पाच दिग्गज नशीब ( 5 HOT Seats with Seniors Leaders In Punjab ) आजमावित आहेत.

पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ चा निकाल अंदाज

संस्था भाजपा काँग्रेस आप एसएडी
इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया 01-04 19-31 76-90 07-11
एबीपी - सी वोटर्स 07-13 22-28 51-61 20-26
चाणक्य 01 10 100 06
पी-मार्क 01-03 23-71 62-70 16-24

117 जागांवर 1304 उमेदवारांचे राजकीय भवितव्य

पंजाबमधील 117 जागांवर 1304 उमेदवारांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी भदौर आणि चमकौर साहिब मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. याशिवाय आपचे सीएम उमेदवार भगवंत मान, काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू, अकाली दलाचे नेते प्रकाश सिंग बादल, सुखबीर बादल यांच्या भवितव्याचाही गुरुवारी निर्णय होणार आहे. यावेळी अकाली दलाने बसपासोबत युती केली आहे. पंजाबमधील 117 जागांपैकी 97 जागा अकाली आणि 20 जागा बसपाने जिंकल्या आहेत. कॅप्टन अमरिंदर यांच्या पक्षाव्यतिरिक्त भाजपने अकाली दलाबरोबर युती केली आहे.

हेही वाचा-Uttarakhand Election 2022 : हे आहेत उत्तराखंडमधील 'टॉप 5 कोट्यधीश' उमेदवार

घराणेशाहीत काँग्रेस पुढे

पंजाबमध्ये भाजप 68, पंजाब लोक काँग्रेस 34 आणि अकाली दल मिळून 15 जागांवर निवडणूक लढवत आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्ष सर्व जागांवर लढत आहेत. याशिवाय संयुक्त समाज मोर्चा आणि संयुक्त संघर्ष पक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहे. राजकारणात घराणेशाही टीका होत असली तरी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या वेळी नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांना राजकारणात आणून त्यांचा वारसा पुढे नेला. या निवडणुकीदरम्यान अनेक कुटुंबे अशी आहेत की त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य रिंगणात होते. निवडणुकीच्या राजकारणात कुटुंब वाढवण्यात काँग्रेस इतर पक्षांपेक्षा पुढे राहिली आहे.

हेही वाचा-Manipur Election 2022 : मणिपूरमध्ये 89 टक्के मतदान; 10 मार्चला कौल येणार

पंतप्रधान मोदींनी सभा घेऊनही मतदानाचे प्रमाण कमी

पंतप्रधान मोदींनी फेब्रुवारीमध्ये जालंधरमध्ये प्रचार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14, 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी पंजाबमध्ये निवडणूक रॅलींना संबोधित केले होते. 14 फेब्रुवारी रोजी जालंधर येथे झालेल्या पंतप्रधानांच्या निवडणूक रॅलीला मोठी गर्दी झाली होती, परंतु जिल्ह्यातही मतदानाची टक्केवारी कमी राहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ फेब्रुवारी रोजी पठाणकोट येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले होते, जिथे तीन जागांना 2017 च्या तुलनेत 3 टक्के कमी मते मिळाली होती. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदार कमी का झाले, याबाबत स्पष्टता नाही. पठाणकोट विधानसभा मतदारसंघात, जेथे 2017 मध्ये 76.49 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत 73.82 टक्के मतदारांनी मतदान केले. पंतप्रधान मोदींची तिसरी रॅली 17 फेब्रुवारी रोजी राजस्थान सीमेजवळ असलेल्या अबोहर विधानसभा मतदारसंघात झाली. येथेही 4.61 टक्के मतदान झाले.

हेही वाचा-Uttarakhand Election 2022 : उत्तराखंडमध्ये मतदार राजाचा कौल कुणाला, हरीश रावत यांच्यासह अनेकांची प्रतिष्ठा पणाला

निवडणुकीच्या काळात काँग्रेसमधील गटबाजी उघड

निवडणुकीच्या काळात हिंदू मतदार काँग्रेसवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यानंतर पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांना मुख्यमंत्री करण्यात आले नाही. हिंदू असल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाली नसल्याची चर्चा होती. त्यामुळे हिंदू मतदारही काँग्रेस, सीएम चन्नी आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिद्धू यांच्यावर नाराज आहेत. नवज्योत सिद्धू हे स्वतःचे मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर नाराज आहेत, कारण ते स्वतः मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते.

बादल कुटुंबाचे पक्षातील अस्तित्व पणाला

निवडणुकीदरम्यान नवज्योतसिंग सिद्धू आणि सुनील जाखड यांच्या वक्तृत्वाचा फटका काँग्रेसला बसल्याने पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी नाराज आहेत. सध्या तरी पंजाब काँग्रेसमध्ये समन्वयाचा मोठा अभाव होता असे म्हणता येईल. दुसरीकडे, शिरोमणी अकाली दलासाठी ही निवडणूक केवळ विश्वासार्हता वाचवण्याची नाही तर अस्तित्व टिकवण्याचीही आहे. अकाली दल निवडणूक जिंकू शकला नाही तर बादल कुटुंबाचे पक्षातील वर्चस्व संपुष्टात येईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

पाकिस्तानच्या सीमेलगत असलेले आणि शेतकरी आंदोलनात सक्रिय घेतलेल्या शेतकऱ्यांमुळे पंजाब विधानसभेच्या निवडणुकीकडे ( election 2022 ) लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीतील जाणून घ्या, ठळक मुद्दे.

पंजाब विधानसभा निवडणुकीत 2022 मध्ये या ठिकाणी आहे अटीतटीच्या लढत (Punjab Vidhan Sabha Elections 2022 )

पंजाब विधानसभा निवडणुकीची लढत यावेळी खूपच रंजक असणार आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्थापन केलेला नवीन पंजाब लोक काँग्रेस पक्षही यावेळी आम आदमी पक्षासोबत निवडणूक लढवण्यासाठी रिंगणात आहे. अकाली दल पहिल्यांदाच भाजपपासून वेगळे निवडणूक लढवत आहे. यावेळी अशा पाच जागा आहेत जिथे पाच दिग्गज नशीब ( 5 HOT Seats with Seniors Leaders In Punjab ) आजमावित आहेत.

  • लांबा विधानसभेची निवडणूक

लांबा विधानसभेची निवडणूक चर्चेत आहे. कारण, शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पाचवेळा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पाडलेले प्रकाशसिंग बादल पुन्हा एकदा रिंगणात आहेत. बादल हे देशातील सर्वात जुन्या नेत्यांपैकी एक आहेत. काँग्रेसने जगपाल सिंग यांना तर आम आदमी पार्टीने गुरमीत खुडिया यांना बादल यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. लांबा विधानसभेच्या जागेवर विविध पक्षांचे एकूण 7 उमेदवार रिंगणात आहेत.

  • अमृतसर पूर्व विधानसभा

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे राष्ट्रीय राजकारणात सतत चर्चेत असतात. ते अमृतसर पूर्व विधानसभेच्या जागेवरून निवडणूक लढवित आहे. त्यांच्या विरोधात अकाली दलाचे नेते बिक्रम मजिठिया हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. वास्तविक, दोन्ही नेत्यांनी आतापर्यंत एकही विधानसभा निवडणूक हरलेली नाही. अशा स्थितीत या दोघांपैकी एकाचा पराभव निश्चित आहे. कोणता नेता बाजी मारणार याकडे जनेतेचे लक्ष लागलेले आहे.

पूर्व अमृतसरमधून एकूण 10 उमेदवार रिंगणात आहेत. येथे भाजप आघाडीने जगमोहन सिंग राजू यांना उमेदवारी दिली आहे. राजू हे तामिळनाडू केडरचे आयएएस अधिकारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेत राजकारणात प्रवेश केला होता.

  • भदौर

चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यामुळे चर्चेत आहे. चन्नीही या जागेवरून निवडणूक लढवित आहेत. खरे तर काँग्रेसने त्यांना दोन विधानसभा जागांवरून उमेदवारी दिली आहे. या जागेवरून नऊ उमेदवार रिंगणात आहेत. आम आदमी पक्षाने चरणजित सिंग आणि अकाली दल-बसपा युतीने हरमोहन सिंग यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवारांनी चन्नी यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला आहे. आहेत. याशिवाय भदौरमधून चन्नीही रिंगणात आहेत. भदौरमध्ये 13 उमेदवार रिंगणात आहेत. आम आदमी पक्षाने लाभ सिंह उघोके तर अकाली दलाने सतनाम सिंग राही यांना उमेदवारी दिली आहे.

  • पटियाला

माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग पटियाला शहरी विधानसभा मतदारसंघातून आपले नशीब आजमावत आहेत. ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे त्यांनी गेल्या निवडणुकीत सांगितले आहे. काँग्रेसपासून फारकत घेत ते पुन्हा रिंगणात आहेत. येथे एकूण 17 उमेदवार रिंगणात आहेत. 'आप'ने माजी महापौर अजितपाल कोहली तर काँग्रेसने माजी महापौर विष्णू शर्मा यांना रिंगणात उतरवले आहे. कॅप्टन यांच्या पक्षाची भाजपसोबत युती आहे. त्यामुळे भाजपने येथे आपला उमेदवार उभा केलेला नाही. ही निवडणूक त्यांचे भविष्यातील राजकारण ठरवेल, असे मानले जात आहे.

  • जलालाबाद

जलालाबाद विधानसभा जागा एसएडी-बसपा युतीसाठी खास आहे. कारण अकाली मुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल रिंगणात आहेत. या जागेवरून 15 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसने मोहन सिंग फलियानवाल यांना तर आम आदमी पक्षाने जगदीप कंबोज यांना तिकीट दिले आहे.

  • धुरी

धुरी विधानसभेची जागा आम आदमी पक्षासाठी महत्त्वाची आहे. कारण त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असलेले उमेदवार भगवंत मान रिंगणात आहेत. या जागेसाठी एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. अकाली दलाने प्रकाश चंद गर्ग यांना तर काँग्रेसने दलवीर सिंग गोल्डी यांना उमेदवारी दिली आहे.

पंजाबमध्ये मतमोजणी केंद्रावर तयारी सुरू

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याची तयारी सुरू आहे. अमृतसरमध्ये मतमोजणी केंद्रावर पोस्टल मतदानाच्या पेट्या नेल्या जात आहेत.

पांच राज्यांचा निकाल एका क्लिकवर

Last Updated : Mar 16, 2022, 9:15 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details