पणजी - मांद्रे म्हणजे स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे अशी ओळख असलेला विधानसभा मतदारसंघ आहे. एका बाजूला उंच डोंगररांगा आणि दुसऱ्या बाजूला असणारा अथांग समुद्र किनारा यांचे देणे मांद्रेला लाभले आहे. अश्वेम, हरमल, केरी आणि मांद्रे हे जगप्रसिद्ध समुद्रकिनारे ( beachs in Mandrem ) या मतदारसंघात आहेत. रशियनसह अनेक विदेशी पर्यटकांचे ( Femous tourist places in Mandrem ) हे आवडते ठिकाण आहे. त्यामुळे या मतदारसंघाला विशेष महत्व आहे.
राजकीय पार्श्वभूमी आणि सद्य परिस्थिती
1972 पासून 2002 पर्यंत हा महाराष्ट्र गोमंतक पक्षाचा बालेकिल्ला होता. मात्र, त्याला 1994 सालचा अपवाद ठरला आहे. 1994 साली या ठिकाणी काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला. मात्र, 2002 नंतर हा गड भाजपने जिंकला. 2002 साली झालेल्या निवडणुकीत भाजपचे आमदार व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा विजय झाला. मात्र 2017 मध्ये येथे पार्सेकर यांचा पराभव झाला. तत्कालीन काँग्रेस उमेदवार दयानंद सोपटे यांचा विजय झाला. मात्र, 1019 ला सोपटे भाजपवासी झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार जित आरोलकर यांचा पराभव केला. ते याच मतदारसंघातून अधिकृतपणे भाजपचे आमदार झाले आहेत. या मतदारसंघात 31, 370 मतदार आहेत.
मांद्रे मतदारसंघाची सद्य परिस्थिती
हेही वाचा-Panaji Assembly Election 2022 : राजधानी पणजी जिंकण्यासाठी भाजपातच चुरस; 'अशी' आहे मतदारसंघाची स्थिती
2017 ची विधानसभा निवडणूक
2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार दयानंद सोपटे यांचा विजय झाला. त्यांनी भाजप उमेदवार व तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पराभव केला. या निवडणुकीत सोपटे यांना 16, 490 तर पार्सेकर यांना 9371 मते मिळाली होती.
हेही वाचा-गोव्यात सातव्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे उद्घाटन, 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्थेचे आवाहन
2019 ची पोटनिवडणुक
2019 साली काँग्रेस आमदार दयानंद सोपटे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा सोपटे यांचा विजय झाला. यावेळी त्यांना अपक्ष आमदार जित आरोलकर यांनी आव्हान दिले होते. या निवडणुकीत सोपटे यांना 13, 468 तर आरोलकर यांना 9, 343 मते मिळाली होती.
हेही वाचा-Congress Leader Enters BJP - गोव्यात काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का
2022 साली होणाऱ्या विधानसभा ( candidates MandremAssembly Elections 2022 )निवडणुकीत संभाव्य उमेदवार
- भाजप- दयानंद सोपटे ( BJP Leader Dayanand Sopate )
- महाराष्ट्र गोमंतक पक्ष- जित आरोलकर ( Maharashtra Gomantak leader Jit Arolkar )
- काँग्रेस- संगीता परब ( Congress leader Sangita Parab )
- आम आदमी पक्ष- प्रसाद शापुरकरस
- शिवसेना- बाबली नाईक
मतदारसंघातील समस्या
रोजगार, पाणी, वीज हे या मतदारसंघातील महत्वाच्या ( Issues in Mandrem constituency ) समस्या आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे महत्वाचे केंद्र असले तर येथील स्थानिकाना नोकरीत हवी तशी संधी उपलब्ध झाली नाही.
मतदारसंघातील उद्योग व व्यवसाय
पर्यटन, टॅक्सी वाहतूक, हॉटेल हे या क्षेत्रातील महत्त्वाचे ( Industries in Mandrem constituency ) व्यवसाय आहेत. मांद्रे क्षेत्रात हरमल, केरी, अश्वेम व मांद्रे ही महत्वाची सागर किनारे (बीच) आहेत. रशियन आणि विदेशी पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. येथे येणारे विदेशी पर्यटक काही महिने भाड्याने घर घेऊन राहतात. त्यामुळे भाड्याने घर देण्याच्या व्यवसायाला चालना मिळाली आहे. यामुळेच स्थानिक बाजारपेठा, टॅक्सी व दुचाकी- चारचाकी वाहने भाड्याने देण्याच्या व्यवसायही चालतो.