बेंगळुरू (कर्नाटक) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या दणदणीत विजयानंतर काँग्रेसचे अध्यक्ष एम. मल्लिकार्जुन खर्गे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला, ज्यांना 'काँग्रेस-मुक्त भारत' हवा आहे त्यांना 'भाजप-मुक्त दक्षिण' मिळाला आहे असा टोला त्यांनी लगावला आहे. भाजपवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, यापुढे असे वक्तव्ये चालणार नाहीत, जनतेच्या वेदना समजून घेतल्या पाहिजेत. 'ज्यांना 'काँग्रेसमुक्त भारत' करायचा होता, त्यांनी आमच्याविरोधात अनेक गोष्टी बोलल्या, पण आज एक गोष्ट खरी ठरली आहे आणि ती म्हणजे 'भाजपमुक्त दक्षिण भारत' असा टोलाही त्यांंनी लगावला आहे.
आम्ही एकत्र काम केल्यामुळे आम्ही जिंकलो : काँग्रेस नेत्यांनी अत्यंत नम्रतेने काम करावे आणि जमिनीशी जोडलेले राहावे. निवडणुकीतील पक्षाचा विजय हा कोणा एका व्यक्तीचा नव्हे तर जनतेचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 35 वर्षांनंतर आम्हाला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यामुळे आम्ही जिंकलो, अन्यथा हे शक्य झाले नसते असही ते म्हणाले आहेत. हा विजय सामूहिक नेतृत्वाचा परिणाम असल्याचही ते म्हणाले आहेत. 'आम्ही एकत्र काम केल्यामुळे आम्ही जिंकलो. जर आम्ही विघटित झालो असतो, तर आम्ही गेल्या वेळी (2018) ज्या स्थितीत होतो, तशीच स्थिती झाली असती असही ते म्हणाले आहेत.