नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील प्रख्यात खाप पंचायतने गावातील पुरुषांना शॉर्ट्स तर मुलींना जीन्स घालण्यास बंदी घातली आहे. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष ठाकूर पूरन सिंह ही घोषणा केली. याचे उल्लंघन केल्यास त्यांना कठोर शिक्षा होईल, असे ते म्हणाले.
पुरुषांना शॉर्ट्स तर मुलींना जीन्स घालण्यास 'खाप'ची बंदी - मुझफ्फरनगर खाप पंचायत
मुझफ्फरनगरमधील प्रख्यात खाप पंचायतने गावातील पुरुषांना शॉर्ट्स तर मुलींना जीन्स घालण्यास बंदी घातली आहे. 'बेटी पढाओ, बेटी बचाओ' या घोषणेवर विश्वास आहे. पण 'आक्षेपार्ह' कपडे परिधान करणार्या मुली समाजात चांगला संदेश पाठवत नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य ठाकूर पूरन सिंह यांनी केले.
'बेटी पढाओ, बेटी बचाओ' या घोषणेवर विश्वास आहे. पण 'आक्षेपार्ह' कपडे परिधान करणार्या मुली समाजात चांगला संदेश पाठवत नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. पंचायतीने घातलेल्या निर्बंधांवर ट्विटरवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. एकविसाव्या शतकात हे असं निर्बंध लादणं योग्य नाही, असे म्हटलं जात आहे.
यापूर्वी तरुणांनी मोबाइल वापरू नये, डीजे पार्टीचे आयोजन करू नये, तसेच मुलींनी जीन्स आणि टी-शर्ट घालू नये असे फतवे हरयाणाच्या हिसारमधील खाप पंचायतीने काढले होते. महिलांना जीन्स आणि मोबाईल फोन वापरण्यास बंदी घालताना खाप पंचायतीच्या नेत्यांनी जीन्स परिधान केलेल्या मुलींनी समाज बिघडवल्याचं सांगितलं होतं. 2014 मध्ये गुजरातच्या पोरबंदर पोलिसांनी एक पोस्टर जाहीर करून त्यामध्ये तरुणींना जीन्स न परिधान करण्याचं आवाहन केले होते.