तिरुवनंतपुरम Kerala Onam Bumper BR93 Lottery Results:(केरळ) तिरुओणमचा बंपर BR-93 लॉटरी निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. केरळ राज्य सरकारनं तिरुओणम बंपर लॉटरी निकाल BR-93 चे विजेते घोषित केले आहेत. केरळ सरकारनं आयोजित केलेल्या बंपर लॉटरींपैकी ही एक आहे. तिरुओणमचं पहिलं बंपर बक्षीस 25 कोटी रुपये आहे. दुसरे पारितोषिक प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे असून ते 20 जणांना मिळालं आहे. तृतीय पुरस्कारासाठी 20 जणांना प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे. केरळ राज्य लॉटरी संचालनालयाकडून दुपारी निकाल जाहीर करण्यात आलाय. केरळ ओणम बंपर 2023 लॉटरी तिकिटाची किंमत 500 रुपये आहे. तिरुओणम बंपरच्या इतिहासात एवढ्या मोठ्या बक्षीसाची ही दुसरी वेळ आहे. यावर्षी ९० लाख तिकिटे छापण्यात आली होती.
यंदा बक्षिसाची रक्कम वाढली :गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बक्षिसाची रक्कम वाढली आहे. एकूण बक्षिसाची रक्कम 125 कोटी 54 लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. यावेळी 20 जणांना द्वितीय पारितोषिक म्हणून प्रत्येकी 1 कोटी रुपये मिळणार आहेत. गतवर्षी द्वितीय पारितोषिक प्रति व्यक्ती 5 कोटी रुपये होतं. तिसरं पारितोषिक प्रत्येकी 20 क्रमांकांसाठी 50 लाख रुपये असेल.
लॉटरी बक्षीस किती काळ वैध :लाॅटरी विजेता सोडतीच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत लॉटरी जिंकलेल्या रकमेवर दावा करू शकतो. बक्षिसाची रक्कम 5 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास, विजेते केरळमधील कोणत्याही लॉटरी दुकानातून पैशांवर दावा करू शकतात. जिंकलेली रक्कम 5 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास, विजेत्यांना त्यांची तिकिटे बँक किंवा सरकारी लॉटरी कार्यालयासमोर आयडी पुराव्यांसह द्यावी लागतील. विजेत्यांनी www.statelottery.gov.in वर भेट द्यावी.
या विजेत्याला मिळालं पहिलं बक्षीस :TE 230662ला 25 कोटी रुपयांचं पहिलं बक्षीस मिळालं आहे.