महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Nobel Prize For Medicine : कॅरिको आणि वेसमन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; 'हे' आहे योगदान - mRNA vaccines

Nobel Prize For Medicine : यंदाच्या वर्षातील वैद्यकशास्त्राच्या (Physiology) नोबेल पुरस्कारांची (Nobel Prize) घोषणा करण्यात आली आहे. कॅटालिन कॅरिको (Katalin Karik) आणि ड्र्यू वेसमन (Drew Weissman) हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2023, 6:49 PM IST

Updated : Oct 2, 2023, 7:36 PM IST

नवी दिल्ली : Nobel Prize For Medicine :कॅरिको आणि ड्र्यू यांना न्यूक्लिओसाइड आधारित बदलांशी संबंधित शोधांसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. त्यांच्या याच शोधामुळं जागतिक महामारी ठरलेल्या कोविड-19 विरुद्ध प्रभावी ठरलेली mRNA लस विकसित करणं शक्य झालंय.

लस शोधण्यात यश : कोरोना जगभरात पसरत होता. त्यावेळी त्यावर कोणतेही लस उपलब्ध नव्हती. जगभरातले शास्त्रज्ञ लस शोधण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा कोरोनावरील लस शोधण्याचं दिव्य काम कॅरिको आणि वेसमन यांनी केलं. या दोन्ही शास्त्रज्ञांनी २०२० मध्ये mRNA या लशीच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले होते. बायोएनटेक आणि मॉडर्ना यांनी कॅरिको आणि वेसमन या दोघांनी शोध लावलेल्या mRNA या लशीचा वापर केला. पुढं बायोएनटेक यांनी फायजर तर मॉडर्नानं वीआसी/ एनआयएच यांच्या मदतीनं लसींची निर्मिती केली.

मानाचा नोबेल पुरस्कार : नोबेल पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जातो. दरवर्षी हा पुरस्कर विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. नोबेल समितीमध्ये ५० तज्ज्ञांचा समावेश होता. मानवजातीसाठी महत्त्वाचं योगदान देणाऱ्या ओषधशास्त्रातील वैज्ञानिकांना हा पुरस्कार दिला जातो.

कोण आहेत कॅरिको : कॅरिकोचा जन्म 1955 मध्ये हंगेरीतील स्झोलनोक येथे झाला. त्यांनी 1982 मध्ये झेगेड विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली आणि 1985 पर्यंत झेगेडमधील हंगेरियन अकादमी ऑफ सायन्सेसमध्ये पोस्टडॉक्टरल संशोधन केलं. 1989 मध्ये पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली, जिथे ते 2013 पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर ते बायोटेक आरएनए फार्मास्युटिकल्समध्ये उपाध्यक्ष आणि नंतर वरिष्ठ उपाध्यक्ष बनले. 2021 पासून ते सेजेड विद्यापीठात प्राध्यापक आणि पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या पेरेलमन स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

कोण आहेत वेसमन : वेसमनचा जन्म 1959 मध्ये लेक्सिंग्टन, मॅसॅच्युसेट्स येथे झाला. त्यांनी 1987 मध्ये बोस्टन विद्यापीठातून एमडी, पीएचडी पदवी प्राप्त केली. नंतर त्यांनी हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या बेथ इस्रायल डेकोनेस मेडिकल सेंटरमध्ये क्लिनिकल प्रशिक्षण आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ येथे पोस्टडॉक्टरल संशोधन केलं. 1997 मध्ये पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील पेरेलमन स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये वेसमन यांनी संशोधन गट स्थापन केला होता.

हेही वाचा -Nobel Prize in Economic Sciences : बेन एस बर्नांक, डग्लस डब्ल्यू डायमंड आणि फिलिप एच डायबवी यांना नोबेल पारितोषिक जाहीर

Last Updated : Oct 2, 2023, 7:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details