महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Kashi Vishwanath Corridor inauguration - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथ कॉरिडोरचे केले लोकार्पण, शिवाजी महाराजांबद्दल म्हणाले... - Kashi Vishwanath Corridor inauguration etvbharat

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ कॉरिडोरचे लोकार्पण केले ( Kashi Vishwanath Corridor inauguration ). यावेळी हे भव्य धाम भाविकांना गतवैभवाची अनुभुती करून देईल. आता मी बाबांबरोबरच कालभैरवजीचे दर्शन करून आलो आहे, देशावासीयांसाठी त्यांचे आशीर्वाद घेऊन आलो आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Kashi Vishwanath Corridor inauguration by PM Narendra modi
काशी विश्वनाथ कॉरिडोर पंतप्रधान मोदी

By

Published : Dec 13, 2021, 5:18 PM IST

Updated : Dec 13, 2021, 5:26 PM IST

वाराणसी -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ कॉरिडोरचे लोकार्पण केले ( Kashi Vishwanath Corridor inauguration ). यावेळी हे भव्य धाम भाविकांना गतवैभवाची अनुभुती करून देईल. आता मी बाबांबरोबरच कालभैरवजीचे दर्शन करून आलो आहे, देशावासीयांसाठी त्यांचे आशीर्वाद घेऊन आलो आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

हेही वाचा -Mandrem constituency election 2022: पर्यटनस्थळ असलेल्या मांद्रे मतदारसंघात कोणत्या नेत्याला मिळणार पसंती...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कॉरिडोरचे निर्माण करणाऱ्या श्रमिकांचे आभार मानले. हे कॉरिडोर पूर्ण करायला त्यांना 35 महिन्यांचा कालावधी लागला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच्या सरकारांचा देखील समाचार घेतला. काशीमध्ये येथील कोतवालाच्या परवानगीशिवाय काहीही होऊ शकत नाही. कोणी मोठा असेल तर, तो आपल्या घरी असेल. येथे बाबा विश्वनाथांच्या परवानगीशिवाय काही होत नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

लोकांकडून घेतले तीन संकल्प

पंतप्रधान मोदी यांनी काशीच्या लोकांकडून तीन संकल्प घेतले. स्वच्छता, सृजनशिलता आणि आत्मनिर्भर भारतासाठी सतत प्रयत्न, हे तीन संकल्प त्यांनी नागरिकांकडून घेतले.

बनारस अजूनही टिकून

देश विदेशातील नागरिक जे दूर असून देखील या क्षणाचे साक्षी ठरले त्यांचे पंतप्रधानांनी आभार मानले. आपल्या पुराणात असे सांगितले गेले आहे की, काशीमध्ये प्रवेश करणारा सर्व पापांपासून मुक्त होतो. वाराणसी युगानुयुगे जगली आहे. तिने इतिहासाला बनताना आणि बिघडताना बघितले आहे. किती कालखंड आले, किती हुकूमती निर्माण झाल्या आणि मातीत मिसळल्या, मात्र बनारस अजूनही टिकून आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

दहशतवाद्यांनी या शहरावर हल्ले केले. औरंगजेबने तलवारीच्या सहाय्याने सभ्यता चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या देशाची माती वेगळीच आहे. इकडे औरंगजेब आल्यास शिवाजी उठून उभे होतात. आज काळाचे चक्र पाहा, दहशतवादाचे ते पर्याय इतिहासाच्या काळ्या पानात बंदिस्त झाले आहेत. आणि माझी काशी पुढे जात आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

बनारसपासून जगतगुरू शंकराचार्यांना मिळाली प्रेरणा

बनारस हे ते शहर आहे जेथे जगतगुरू शंकराचार्यांना देखील प्रेरणा मिळाली होती आणि त्यांनी देशाला एका सूत्रात बांधण्याचा संकल्प घेतला होता. काशी ही भारताच्या आत्म्याचा जीवंत अवतार आहे. काशीमध्ये मंदिर तोडण्यात आले तेव्हा राणी अहिल्याबाई होळकर यांनी त्याचे निर्माण करवून घेतले, मी त्यांना नमन करतो. राणी अहिल्याबाई नंतर काशीसाठी एवढे कार्य आता झाले आहे. महाराजा रणजित सिंग यांनी मंदिराच्या शिखरावर सोने जडवले होते, अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली.

गांधींचे स्वप्न काशीत प्रथमच पूर्ण झाले - योगी

महात्मा गांधींच्या नावावर आनेक लोकांनी सत्ता मिळवली, मात्र काशी विश्वनाथ धामच्या त्यांच्या स्वप्नाची पूर्ती करण्याचे कार्य पहिल्यांदा पाहायला मिळत आहे. आज बाबा विश्वनाथ धाम एका नव्या रुपात दिसून येत आहे, आणि ते महात्मा गांधींच्या त्या पीडेला दूर करण्याचे माध्यम ठरले आहे जी आजपासून 100 वर्षांआधी याच काशीमध्ये येऊन त्यांनी येथील अरुंद गल्ल्या आणि अस्वच्छता पाहून व्यक्त केली होती, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा -Soldier Shoots Self : कुपवारामध्ये जवानाची स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या

Last Updated : Dec 13, 2021, 5:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details