Karnataka Election : कर्नाटक राज्याची विधानसभा निवडणूक ही सर्वपक्षांसाठी मह्त्वाची होती. या निवडणुकीकडे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची सेमी फायनल म्हणून पाहिले जात होते. या सेमी फायनलमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसने प्रचार करताना कर्नाटकातील जनतेचा विश्वास कमावत बजरंगबलीचा आशीर्वाद विजयाच्या रुपाने मिळवला आहे.
भाजप प्रत्येक निवडणूक पराभूत होणार : काँग्रेसने 136 जागांवर विजय मिळवत भाजपाचा सुपडा साफ केला आहे. घवघवीत यश मिळावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील जनतेचे आणि कर्नाटकमधील नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. कर्नाटकाच्या निवडणुकीत एकाबाजुला भांडवलदारांची ताकद होती, तर दुसरीकडे गरीब जनतेची शक्ती होती. या शक्तीने भांडवलदारांच्या ताकदीचा पराभव केला आहे. हेच चित्र आता देशात दिसेल असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन यांनीही अशाच प्रकारचा विश्वास व्यक्त केला आहे. रंजन यांनी निकालपूर्वीच भाजपच्या पराभवाविषयी भाकीत केले होते. निवडणूक मोठ्या फरकाने पराभूत होणार आहे, पुढील काळात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीतही भाजपाचा पराभव होईल, असे ते म्हणाले होते. दरम्यान भाजप नेते बसवराज बोम्मई यांनी पराभव स्विकारत पुन्हा येणार असल्याचे म्हटले आहे. हा निकाल गांभीर्याने घेत पुढच्या वर्षी लोकसभेत दमदार कामगिरी करू असे बोम्मई म्हणालेत.
काँग्रेसने जनतेचे मुद्दे मांडले : भाजपाने धर्म आणि बजरंगबली, आरक्षण, या मुद्द्यांवरुन निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला परंतु कर्नाटकाच्या जनतेना त्यांना घरी बसवले. त्याच बाजुला नेहमी जनतेचे मुद्दे घेऊन काँग्रेसने दमदार विजय मिळवला. काँग्रेसने सुरुवातीपासून शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेस सर्वात जास्त भ्रष्टाचाराचा मुद्दा आपल्या प्रचारात लावून धरला, त्याचे फलित म्हणजे 136 जागांवर एक हाती विजय मिळवला.
दमदार नेत्यांचा पराभव : भाजपासाठी कर्नाटक निवडणुकीचा पराभव हा 440 च्या इटक्यासारखी आहे. काँगेसने एक चांगल्या रणनीतीने प्रचार करत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले आहे. यात काँग्रेसने उपस्थित केलेले स्थानिक प्रश्नामुळे भाजपाला कोणताच डाव खेळता आला नाही. काँग्रेसने राहुल गांधींची अपात्रता, ईडी-सीबीआयची कारवाई, अदानी-हिंडेनबर्ग प्रकरण हे मुद्दे प्रचारात घेतले नव्हते. रोजगार, महागाई, भ्रष्टाचार, कायदा -सुव्यवस्थेचे प्रश्न उपस्थित करत भाजपावर आरोप केले होते. काँग्रेसच्या या खेळीमुळे भाजपचे दमदार नेते देखील पराभूत झाले.