बंगळुरू :कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. एक्झिट पोलने दोन्ही राष्ट्रीय पक्षाला मोठ्या प्रमाणात यश मिळणार असल्याचा दावा केला होता. त्यातही एक्झिट पोलने जेडीएसला 30 ते 32 जागा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र निवडणुकीत काँग्रेसने आघाडी घेतली असून भाजप सध्यातरी मागे पडले आहे. कर्नाटक निकालाबाबत कोणत्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली हे आपण जाणून घेणार आहोत.
चांगल्या विकासाची आशा :माझा पक्ष छोटा असून मी माझ्यासाठी कोणतीही मागणी करत नाही. मला चांगल्या विकासाची आशा असल्याची प्रतिक्रिया जेडी (एस) नेते एचडी कुमारस्वामी यांनी केली आहे.
काँग्रेसचा जल्लोष सुरू :10 मे रोजी झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी मतमोजणीपूर्वी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात जल्लोष सुरू झाला होता. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळणार असल्याचा विश्वास आहे. काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळेल आणि कर्नाटकात सरकार स्थापन होईल. आम्हाला विश्वास आहे की आम्ही स्वबळावर सरकार बनवू : यतिंद्र सिद्धरामय्या, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र