बंगळुरू - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची शनिवारी बंगळुरूमध्ये भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे कुटुंबातील सदस्याच्या लग्नानिमित्त बंगळुरूला आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन अभिनंदन केले. पवार हे बंगळुरूमध्ये चार दिवस राहणार आहेत. त्यांच्या भेटीदरम्यान मंत्री आर. अशोक उपस्थित होते.
शरद पवारांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बंगळुरूमध्ये घेतली भेट शरद पवार आणि बसवराज बोम्माई यांच्या भेटीत दोन्ही राज्यांमधील पुरस्थितीत एकमेकांना सहकार्य करण्याविषयी चर्चा करण्यात आली. राज्यांमधील पाण्याबाबतचा वाद आणि सामाईक नद्यांबाबत चर्चा करण्याचे दोन्ही नेत्यांनी दिल्लीमध्ये ठरविले होते.
शरद पवारांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बंगळुरूमध्ये घेतली भेट हेही वाचा-न्यायाधीशांच्या संरक्षणाकरिता सीबीआयने काहीही केले नाही- सर्वोच्च न्यायालय
शरद पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती ट्विट करून दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की मुख्यमंत्री बोम्माई यांचा फोन आला होता. त्यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या पदाचा विचार करता मी जाण्याचे ठरविले. त्यांनी केलेल्या मनपूर्वक आदरातिथ्याबद्दल आभारी आहे. येत्या काही वर्षातही दोन्ही राज्ये सहकार्याच्या दृष्टीने काम सुरुच ठेवतील, अशी आशा आहे.
हेही वाचा-हॉकीपटू वंदना कटारियाच्या घरापुढे फटाके फोडणाऱ्या व्यक्तीला अटक